नवनीत राणांना पाडण्यासाठी बच्चू कडूंना मातोश्रीतून रसद; रवी राणा यांचा गंभीर आरोप

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले असले तरी आरोपप्रत्यारोपांच्या फैरी अजूनही थांबलेल्या नाहीत. अमरावतीतील नवनीत राणा यांचा पराभव आमदार रवी राणा यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे रवी राणा यांनी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका करताना त्यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे.

नवनीत राणांना पाडण्यासाठी बच्चू कडूंना मातोश्रीतून रसद; रवी राणा यांचा गंभीर आरोप
ravi ranaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 2:41 PM

भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा अमरावतीत पराभव झाला. नवनीत राणा यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला. त्यामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे महायुतीतीलच घटक पक्षाने म्हणजे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने हा पराभव घडवून आणला. त्यामुळे महायुतीसाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे. या पराभवानंतर आता आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात चांगलीच जुंपली आहे. नवनीत राणांना पाडण्यासाठी आणि अमरावतीत उमेदवार देण्यासाठी बच्चू कडू यांना मातोश्रीतून रसद पुरवल्या जात होती, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आमदार रवी राणा यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. बच्चू कडू हे तोडीबाज आणि मांडवलीबाज नेते आहेत. ते खोक्याचं राजकारण करत आले आहेत. ते कुणाचीही सुपारी घेऊ शकतात. त्यांना मातोश्रीवरून रसद आली, अनेक ठिकाणाहून रसद आली. उमेदवारी मागे घेण्यासाठी माझ्यासोबत बार्गेनिंग करण्यात आली. माझ्याकडे निरोप आला. चर्चा झाली. ते सर्व मी अचलपूरच्या जनतेला योग्यवेळी सांगणार आहे, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.

मला थांबवण्याचा दम नाही

दोन महिन्यात सर्वांचा जनता हिशोब करणार आहे. आता रवी राणांचा नंबर आहे, असा दम बच्चू कडू यांनी मला दिला आहे. मला इथपर्यंत जनतेने पोहोचवलं आहे. जनता मला जेव्हा थांबा म्हणेल, तेव्हाच मी थांबेल. मला थांबवण्याचा कोणत्याही नेत्यात दम नाही, असा इशाराच राणा यांनी दिला.

ते दगाबाज

त्यांच्या मतदारसंघात त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. बार्गेनिंग करून गप्प बसायचं आणि सरेंडर व्हायचं हे त्यांचं राजकारण आहे. हा दगाबाज असल्याचं महायुतीच्या नेत्यांनाही माहीत आहे. ते ज्या ताटात खातात तिथेच छिद्र करतात, असंही ते म्हणाले.

आम्ही पराभूत होऊन जिंकलो

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच नवनीत राणा यांनी त्यांच्या पराभवावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पराभूत होऊनही आम्ही जिंकलो आहे. कारण आमचे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत. मी माझ्या मतदारसंघात प्रचंड काम केलं. पण मला जनतेने का थांबवलं ते कळलं नाही. राज्यात काम करायचे की कुठे हे ठरवले नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या.

काही लोक केवळ…

काही लोकं मैदान जिंकण्यासाठी येतात, तर काही लोकं दुसऱ्यांना पराभूत करण्यासाठी येतात, असा टोला नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना लगावला. अमरावतीत नेमकं काय घडलं हे आमच्या नेत्यांना माहीत आहे. आमच्या कार्यकर्त्यांनाही काही सांगायची गरज नाही, असं सूचक विधान त्यांनी केलं.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....