AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपला मेटाकुटीला आणणाऱ्या 40 मतदारसंघांचा निकाल

भाजपने 288 जागांपैकी 164 जागा लढवल्या होत्या, मात्र 122 जागा जिंकण्याची खात्री असताना 40 जागांविषयी भाजपला धाकधूक होती.

भाजपला मेटाकुटीला आणणाऱ्या 40 मतदारसंघांचा निकाल
| Updated on: Oct 25, 2019 | 1:17 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result) भाजपने मुसंडी मारत 105 जागा मिळवल्या आहेत, मात्र 145 ची मॅजिक फिगर एकहाती गाठण्यात भाजपला अपयश आलं. भाजपने 288 जागांपैकी 164 जागा लढवल्या होत्या, मात्र 122 जागा जिंकण्याची खात्री असताना 40 जागांविषयी भाजपला धाकधूक (Difficult Seats for BJP) होती. या मेटाकुटीला आणणाऱ्या 40 पैकी 23 जागा भाजपने गमावल्याच, पण सोप्या वाटणाऱ्या वेगळ्या 36 जागाही भाजपला जिंकता आल्या नाहीत.

काँग्रेसकडून 14, राष्ट्रवादीकडून 7 जागांवर भाजपला पराभव स्वीकारावा लागला. एका जागेवर माकप, तर एका जागेवर क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या उमेदवाराकडून भाजपने पराभवाची धूळ चाखली. भाजपला जेरीस आणणाऱ्या 40 मतदारसंघांचा निकाल (Difficult Seats for BJP)

नवापूर, नंदुरबार – भरत गावित (काँग्रेसमधून आयात) – पराभूत (काँग्रेसचे शिरीष नाईक विजयी) धुळे ग्रामीण, धुळे – ज्ञानज्योती बदाणे पाटील पराभूत (काँग्रेस आमदार कुणाल पाटील विजयी) शिरपूर, धुळे – काशिराम पावरा (काँग्रेसमधून आयात) विजयी  चिखली, बुलडाणा – श्वेता महाले (भाजप) विजयी अकोट, अकोला – प्रकाश भारसाकळे (विद्यमान आमदार) विजयी अकोला पश्चिम, अकोला – गोवर्धन शर्मा (विद्यमान आमदार) विजयी वाशिम, वाशिम – लखन मलिक (विद्यमान आमदार) विजयी धामणगाव रेल्वे, अमरावती – प्रताप अरुण अडसड विजयी दर्यापूर, अमरावती – रमेश बुंदिले (विद्यमान आमदार) पराभूत (काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी) काटोल, नागपूर – चरण सिंह ठाकूर पराभूत (राष्ट्रवादीचे अनिल देशमुख विजयी) सावनेर, नागपूर – राजीव पोतदार पराभूत (काँग्रेस आमदार सुनील केदार विजयी) नागपूर उत्तर, नागपूर – डॉ. मिलिंद माने (विद्यमान आमदार) पराभूत (काँग्रेसचे नितीन राऊत विजयी) कामठी, नागपूर – टेकचंद सावरकर (चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी तिकीट) विजयी साकोली, भंडारा – परिणय फुके पराभूत (काँग्रेसचे नाना पटोले विजयी राजुरा, चंद्रपूर – संजय धोटे (विद्यमान आमदार) पराभूत (काँग्रेसचे सुभाष धोटे विजयी) (Difficult Seats for BJP) यवतमाळ, यवतमाळ – मदन येरावार (विद्यमान आमदार) विजयी वणी, यवतमाळ – संजीव रेड्डी बोदकुलवार (विद्यमान आमदार) विजयी पुसद, यवतमाळ – निलय नाईक पराभूत (राष्ट्रवादीचे इंद्रनिल मनोहर नाईक विजयी) भोकर, नांदेड – बापूसाहेब गोर्टेकर पराभूत (काँग्रेसचे अशोक चव्हाण विजयी) औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद – अतुल सावे (विद्यमान आमदार) विजयी नाशिक पश्चिम, नाशिक – सीमा हिरे (विद्यमान आमदार) विजयी डहाणू, पालघर – पास्कल धनारे पराभूत (माकपचे विनोद निकोले विजयी) मालाड पश्चिम, मुंबई – रमेश सिंग ठाकूर पराभूत (काँग्रेस आमदार अस्लम शेख विजयी) वर्सोवा, मुंबई – भारती लव्हेकर (विद्यमान आमदार) विजयी वांद्रे पश्चिम, मुंबई – आशिष शेलार (विद्यमान मंत्री) विजयी पेण, रायगड – रवीशेठ पाटील विजयी दौंड, पुणे – राहुल कुल (रासपतून बाहेर भाजपच्या चिन्हावर) विजयी मावळ, पुणे – बाळा भेगडे (विद्यमान राज्यमंत्री) पराभूत (राष्ट्रवादीचे सचिन शेळके विजयी) शिरुर, पुणे – बाबुराव पाचर्डे (विद्यमान आमदार) पराभूत (राष्ट्रवादीचे अशोक पवार विजयी) नेवासा, अहमदनगर – बाळासाहेब मुरकुटे (विद्यमान आमदार) पराभूत (क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख विजयी) कर्जत-जामखेड, अहमदनगर – राम शिंदे (विद्यमान मंत्री) पराभूत (राष्ट्रवादीचे रोहित पवार विजयी) परळी, बीड – पंकजा मुंडे (विद्यमान मंत्री) पराभूत (राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे विजयी) लातूर शहर, लातूर – शैलेश लाहोटी पराभूत (काँग्रेस आमदार अमित देशमुख विजयी) औसा, लातूर – अभिमन्यू पवार (मुख्यमंत्र्यांचे पीए) विजयी पंढरपूर, सोलापूर – सुधाकरराव परिचारक पराभूत (काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेले भारत भालके विजयी) वाई, सातारा – मदन भोसले पराभूत (राष्ट्रवादीचे आमदार मकरंद जाधव विजयी) कराड दक्षिण, सातारा – अतुल भोसले पराभूत (काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण विजयी) कणकवली, सिंधुदुर्ग – नितेश राणे विजयी (काँग्रेसचे आयाराम) कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर – अमल महाडिक (विद्यमान आमदार) पराभूत (काँग्रेसचे ऋतुराज पाटील विजयी) जत, सांगली – विलासराव जगताप (विद्यमान आमदार) पराभूत (काँग्रेसचे विक्रम सावंत विजयी)

(Difficult Seats for BJP)

संबंधित बातम्या :

BJP MLA List | भाजप आमदारांची संपूर्ण यादी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.