AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हॅटिकनमध्ये मोदींनी बायबलची प्रत मस्तकी लावली, अंध भक्तांनी आता काय करावे, सामनातून चिमटे

व्हॅटिकनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोप यांनी भेट दिलेल्या बायबलची प्रत मस्तकी लावली. त्यावरुन आता सामनातून मोदी आणि मोदी भक्तांवर टीका करण्यात आली आहे. मोदी हे अचानक नवाज मियाँना भेटतात, पोप महाराजांनाही भेटतात, हे सर्व मोदींना शोभते. दुसरे कोणी हे सद्सदविवेकबुद्धीने केले असते तर हाय तोबा तोबा झालं असतं, असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे.

व्हॅटिकनमध्ये मोदींनी बायबलची प्रत मस्तकी लावली, अंध भक्तांनी आता काय करावे, सामनातून चिमटे
Pm Narendra Modi
| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 8:11 AM
Share

मुंबई : व्हॅटिकनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोप यांनी भेट दिलेल्या बायबलची प्रत मस्तकी लावली. त्यावरुन आता सामनातून मोदी आणि मोदी भक्तांवर टीका करण्यात आली आहे. मोदी हे अचानक नवाज मियाँना भेटतात, पोप महाराजांनाही भेटतात, हे सर्व मोदींना शोभते. दुसरे कोणी हे सद्सदविवेकबुद्धीने केले असते तर हाय तोबा तोबा झालं असतं, असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे.

देश धर्मनिरपेक्ष आहे, असेच मोदींनी ‘व्हॅटिकन’मधून जगाला कळवले

पंतप्रधान मोदी पोप यांना नुसतेच भेटले नाहीत तर पोप यांनी भेट दिलेल्या बायबलची प्रत मस्तकी लावली. मोदी यांनी आपल्या या कृतीतून स्वदेशातील मूलतत्त्ववाद्यांना कठोर संदेश दिला. देशात लोकशाही आहे. देश धर्मनिरपेक्ष आहे, असेच मोदींनी ‘व्हॅटिकन’मधून जगाला कळवले. मोदी हे अचानक नवाज मियाँना भेटतात, पोप महाराजांनाही भेटतात, हे सर्व मोदींना शोभते. दुसरे कोणी हे सद्सदविवेकबुद्धीने केले असते तर हाय तोबा तोबा! राष्ट्र, धर्म, संस्कार, भ्रष्टच झाला असता आणि शुद्धीकरण मोहिमा सुरु झाल्या असत्या. अंध भक्तांनी आता काय करावे, हे मोदींनाच ‘मन की बात’मधून सांगावे लागेल!

युरोप दौऱ्यावर असलेले आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी हे पोप यांना भेटण्यासाठी व्हॅटिकन सिटीत गेले. मोदी हे साधारण तासभर पोपसाहेबांच्या सहवासात होते. पोपसाहेबांनी मोदी यांना पवित्र धर्मग्रंथ बायबल दिला आणि मोदी यांनी अत्यंत श्रद्धेने बायबलची प्रत मस्तकी लावली. मोदींनी दाखवलेल्या या श्रद्धेबद्दल अंधश्रद्धाळू भक्तांना काय म्हणायचे आहे? मोदी यांनी पोप यांना हिंदुस्थानात यायचे खास आमंत्रणही दिले. मोदी हे इटलीत गेले आणि अचानक पोप यांना भेटले. चारेक वर्षांपूर्वी मोदी हे विमान प्रवासात असताना अचानक इस्लामाबादेत उतरले होते आणि नवाज शरीफ यांना भेटायला गेले होते.

मोदी हे स्वत:ची प्रतिमा सहिष्णू, धर्मनिरपेक्ष वगैरे असल्याचे सिद्ध करत असतात

कधी नवाज मियाँ तर कधी पोपसाहेब यांना भेटून मोदी हे स्वत:ची प्रतिमा सहिष्णू, धर्मनिरपेक्ष वगैरे असल्याचे सिद्ध करत असतात. मोदी हे पोप यांना भेटले. त्यांनी या सर्वोच्च ख्रिश्चन धर्मगुरुंचे आशीर्वाद घेतले. पोपसाहेबांचे स्थान जगात मोठे आहे. त्यांच्या शब्दाला आणि अस्तित्वाला मान आहे. पोप यांना भेटणे यात एक आनंदच असतो. व्हॅटिकनच्या माध्यमातून जगभरात ख्रिस्ती मिशनऱयांचे सामाजिक कार्य सुरूच असते. व्हॅटिकनची आर्थिक ताकद मोठी आहे. व्हॅटिकनची आर्थिक उलाढाल चार अब्ज युरो इतकी आहे. व्हॅटिकनची स्वत:ची बँक आहे. त्या बँकेची उलाढाल आपल्या रिझर्व्ह बँकेच्या पन्नासपट आहे. जगातील सगळ्य़ात श्रीमंत धर्म म्हणून ख्रिश्चन धर्माचाच उल्लेख करावा लागेल. जगातील 55 टक्के संपत्तीचे मालक ख्रिश्चन धर्मीय आहेत. त्याखालोखाल 5.8 टक्के मुस्लिम, हिंदू 3.4 टक्के, ज्यू 1.2 टक्के असा क्रम लागतो. म्हणजे जगातील श्रीमंत धर्मगुरुंना भेटायला आपले पंतप्रधान गेले. मौदी आणि पोप यांच्यात म्हणे जगातील गरिबी निर्मूलन तसेच हवामान बदलावर चर्चा झाली.

गरिबीचे निर्मूलन झाले आहे. अमेरिका, युरोपातील अनेक ख्रिश्चन देशही आपल्या गरीब जनतेची चांगल्याप्रकारे काळजी घेत आहेत. या राष्ट्रांना आर्थिक महासत्ता म्हटले जाते. मोदी आणि पोप यांच्यात गरिबी निर्मूलनावर चर्चा झालीच असेल तर आपल्या देशातील गरिबी निर्मूलनाबाबत पंतप्रधान मोदी यांनी पोपसाहेबांना नक्की कोणती माहिती दिली? मोदी आणि पोप यांच्यात चर्चा सुरु असतानाच इकडे ‘मनरेगा’ म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत आर्थिक खडखडाट झाल्याचे वृत्त समोर आले. योजनेसाठी असलेला पैसा संपला असून या योजनेवर काम करणाऱया मजुरांची दिवाळी अंधारातच जाणार, असे चित्र निर्माण झाले आहे. देशातील 21 राज्यांत ‘मनरेगा’चे काम चालत असते.

2020-21 मध्ये 7.75 कोटी कुटुंबांना या योजनेंतर्गत काम आणि रोजगार मिळाला. आता ही योजनाच आर्थिक संकटात सापडल्याने हिंदुस्थानातील गरीबांवर मोठेच संकट कोसळले आहे. पोप आणि मोदी भेटीत गरिबी निर्मूलनावर चर्चा झाली म्हणून मनरेगाचा प्रश्न आम्ही येथे मांडला. हिंदुस्थानातील शेतकरी त्यांच्या हक्कांसाठी एक वर्षापासून लढत आहेत. त्या गरीब शेतकऱयांना चिरडून ठार मारण्याचे अघोरी प्रयोग झाले. गरिबी निर्मूलनाच्या जागी गरीबांचेच निर्मूलन करावे, अशी ही योजना दिसते. महागाईच्या वणव्यात गरीब होरपळला आहे. हिंदुस्थानची लूट करून उद्योगपती, नोकरशहा परदेशात पळून जात आहेत. अशाने मोदींच्या देशात गरिबीचे निर्मूलन कसे होणार? पोप यांच्याही मनात हे सर्व प्रश्न असणारच आणि पोप यांच्याबरोबरच्या चर्चेत गरिबी निर्मूलनाबाबत मतप्रदर्शन झालेच असणार. पंतप्रधान मोदी आणि पोपसाहेबांची भेट ऐतिहासिक असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नड्डा यांनी सांगितले आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, ‘मोदी-पोप भेट इतिहासाच्या पुस्तकात नोंद करण्यासारखी आहे. शांतता, सौहार्द आणि परस्पर संवादाच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे.

हिंदुस्थान ही सर्वसमावेशक लोकशाही आहे. येथील ख्रिश्चन समुदायाने राजकारण, चित्रपट, व्यवसाय, सशस्त्रा सेना यांसारख्या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. ‘भाजपने पोप तसेच ख्रिस्ती समुदायाविषयीचे हे विचार सदैव कायम ठेवावे, इतकीच जगाची अपेक्षा आहे. पोप यांच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्म प्रसाराचे काम चालते, असे भाजप व त्यांच्या अंगीकृत संघटनांचे मत होते व आहे. हिंदुस्थानातील धर्मातरांमागे मिशनरी आहेत असे आरोप भाजपच्या अंगीकृत संघटनांकडून होत असतात.

भाजप आणि संघ परिवाराची पोप तसेच व्हॅटिकनविषयी अंतःस्थ मते काहीही असली तरी पंतप्रधान मोदी हे पोप यांना भेटल्यामुळे ही भेट क्रांतिकारक, ऐतिहासिक आणि जगाला दिशादर्शक वगैरे ठरलीच आहे. मोदी-पोप भेटीने गरिबी निर्मूलन होईलच आणि हवामान बदलाच्या समस्येवरही मार्ग निघेल. पोपसाहेबांनी मोदींचे निमंत्रण स्वीकारले आणि ते दिल्लीत येतील. 1999 साली तेव्हाचे पोप दिल्लीत अवतरले होते. तेव्हाच्या पोप यांना सोनिया गांधी भेटल्या म्हणून तत्कालीन भाजपने भलतेच काहूर माजवले होते. पण पंतप्रधान मोदी पोप यांना नुसतेच भेटले नाहीत तर पोप यांनी भेट दिलेल्या बायबलची प्रत मस्तकी लावली.

आपला हिंदू धर्म हेच तर शिकवितो. स्वधर्माचे संरक्षण तर आपण केलेच पाहिजे, पण परधर्माविषयीही आदरभाव ठेवला पाहिजे. अन्य धार्मिक ग्रंथ मस्तकी लावले पाहिजेत अशीच आपल्या धर्माची शिकवण आहे. मोदी यांनी आपल्या या कृतीतून स्वदेशातील मूलतत्त्ववाद्यांना कठोर संदेश दिला. देशात लोकशाही आहे. देश धर्मनिरपेक्ष आहे, असेच मोदींनी ‘व्हॅटिकन’मधून जगाला कळवले. मोदी हे अचानक नवाज मियाँना भेटतात, पोप महाराजांनाही भेटतात, हे सर्व मोदींना शोभते. दुसरे कोणी हे सद्सदविवेकबुद्धीने केले असते तर हाय तौबा तोबा! राष्ट्र, धर्म, संस्कार, भ्रष्टच झाला असता आणि शुद्धीकरण मोहिमा सुरु झाल्या असत्या. अंध भक्तांनी आता काय करावे, हे मोदींनाच ‘मन की बात’मधून सांगावे लागेल!

संबंधित बातम्या :

जलयुक्त शिवार योजनेचे लाभार्थी राजकीयच, क्लिनचिट नसताना मिळाली म्हणून बोंबलतायत, कुठे मिळते हे अजब रसायन?, सामनातून टीका

कोरोनाने भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य दोन वर्षांनी घटवले, या दाहक निष्कर्षाचे काय, सामनातून सवाल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.