AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक की धर्मवीर? अण्णाजी पंतांचे तारतम्य!”, संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला करण्यात आला आहे. पाहा नेमकं काय म्हणण्यात आलं आहे....

छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक की धर्मवीर? अण्णाजी पंतांचे तारतम्य!, संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jan 03, 2023 | 8:12 AM
Share

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत विधिमंडळ अधिवेशनादरम्यान एक विधान केलं. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखात (Saamana Editorial) यावरच भाष्य करण्यात आलं आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक धोरणांवर छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो. त्याच स्वराज्य रक्षणासाठी संभाजीराजांनी इतिहासातील सगळय़ात मोठा त्याग व बलिदान केले.

एखादा तपस्वी व धर्मवीरच असे बलिदान करू शकतो. त्या धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर आहेत, राजभवनात ठाण मांडून बसले आहेत. त्यांना पाठीशी घालणारे अण्णाजी पंतांचे समर्थक अजित पवारांना तारतम्य बाळगण्याचा सल्ला देतात हीच खरी गंमत आहे. आधी शिवराय अपमानप्रकरणी राज्यपालांना हटवण्याची मागणी करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तारतम्य बाळगणार आहेत काय?, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून भाजपने धुरळा उडवायला सुरुवात केली आहे. ”छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्य रक्षक म्हणतो. ते धर्मवीर नव्हते. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचा कुठे पुरस्कार केला नाही.” असे विधान अजित पवार यांनी करताच भाजपपुरस्कृत धुळवड संघटनांनी गदारोळ सुरू केला.

संभाजीराजांचे बलिदान हे धर्मासाठीच होते याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही, पण छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्य रक्षणासाठीही छत्रपती संभाजीराजेंनी त्याग आणि बलिदान केले, असं सामनातून म्हणण्यात आलं आहे.

संभाजीराजांना स्वराज्य व धर्मरक्षणासाठी शेवटी हौतात्म्य पत्करावे लागले. त्यांनी यातना सहन केल्या, मरण पत्करले; पण मोगलांशी तडजोड केली नाही. त्यामुळे स्वराज्य व धर्मरक्षणासाठी संभाजीराजांनी केलेला त्याग व शौर्याचे वर्णन करावयास शब्द नाहीत. हा शौर्याचा व धर्मरक्षणाचा वारसा संभाजीराजांनी आपल्या राजश्री आबासाहेबांकडून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतला.

दि. 6 जानेवारी 1681 रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपाळ भट अग्निहोत्री महाबळेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे. संभाजीराजे म्हणतात, ”राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हांस अगत्य.” याचा अर्थ सरळ स्पष्ट आहे, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.

Follow Us
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...
पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
Mumai Rain Update | पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?