धनंजय मुंडे प्रकरणाची योग्य ती चौकशी करा, अबू आझमी यांची मागणी

अबू आझमी यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. (Abu Azmi Comment on Dhananjay Munde Rape Allegation)

  • गोविंद ठाकूर, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 0:01 AM, 18 Jan 2021
धनंजय मुंडे प्रकरणाची योग्य ती चौकशी करा, अबू आझमी यांची मागणी

मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार पार्टी आमदार अबू आझमी यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. धनंजय मुंडेंच्या मला या प्रकरणाबाबत जास्त काहीही माहिती नाही. पण याची चौकशी व्हायला हवी, असे अबू आझमी यांनी सांगितले. (Abu Azmi Comment on Dhananjay Munde Rape Allegation)

“आपल्या देशात दोन प्रकारचे कायदे आहे. एका कायद्यानुसार कोणतीही मुलगी लग्नापूर्वी कोणत्याही पुरुषासोबत लिव्हींग रिलेशनमध्ये राहू शकते. जर लिव्हींग रिलेशनमध्ये एखादी मुलगी जर राहत असेल तर काहीही होऊ शकते. पण काही दिवसांनतर जर ती मुलगी ब्लॅकमेल करायला लागेल. तर काय होईल,” असा प्रश्नही अबू आझमी म्हणाले.

“पण दुसऱ्या बाजूला कोणीही तुम्हाला मुर्ख बनवत चुकीचे काम केले. या दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे याची योग्य ती चौकशी व्हावी. पण लिव्हिंग रिलेशनमध्ये राहताना अनेक अडचणी येत आहे. त्याबाबत काही तरी करणेचे आहे,” असेही अबू आझमी यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

रेणू शर्मा असे या धनंजय मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. रेणू शर्मा ही एक बॉलिवूड गायिका आहे. रेणू अशोक शर्मा असे तिचे संपूर्ण नाव आहे. “रेणू शर्मा यांच्या दाव्यानुसार, रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ओळख 1997 मध्ये झाली. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे हे मध्य प्रदेशातील इंदुरमध्ये बहीण करुणा शर्मा यांच्या घरी भेटले.

त्यावेळी रेणू शर्मा यांचे वय 16-17 इतके होते. धनंजय मुंडे आणि करुणा या दोघांचा 1998 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर 2006 मध्ये करुणा या प्रसूतीसाठी इंदुरमध्ये गेली होती. त्यावेळी रेणू घरात एकटी आहे, हे धनंजय मुंडेंना माहिती होतं. त्यावेळी धनंजय मुंडे काहीही न सांगता रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. धनंजय मुंडे दर दोन-तीन दिवसांनी माझ्या घरी यायचे आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. याबाबतचा एक व्हिडीओही काढला होता. यानंतर धनंजय मुंडे यांनी मला वारंवार फोन करत प्रेम करत असल्याची कबुली दिली. तसेच मला सांगितले की, जर तुला गायिका बनायचे असेल, तर मी तुला बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शक निर्मांत्याशी भेटवेन. तुला बॉलिवूडमध्ये लाँच करेन. या नावाखाली धनंजय मुंडेंनी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवला. तसेच माझी बहीण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले.” (Abu Azmi Comment on Dhananjay Munde Rape Allegation)

संबंधित बातम्या :