युतीतील पहिला बंडाचा झेंडा कोल्हापुरात, समरजीत घाटगेंचा राजीनामा, अपक्ष लढणार

सचिन पाटील

Updated on: Sep 30, 2019 | 7:52 PM

भाजपकडून इच्छुक असलेले समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे.

युतीतील पहिला बंडाचा झेंडा कोल्हापुरात, समरजीत घाटगेंचा राजीनामा, अपक्ष लढणार

Samarjit Singh Ghatge कोल्हापूर : शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नसतानाही, शिवसेनेकडून एबी फॉर्म वाटले जात आहेत. सेनेने आपल्या वाट्याच्या कागल मतदारसंघातही उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपकडून इच्छुक असलेले समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे.

कागल मतदारसंघातील भाजपकडून इच्छुक उमेदवार समरजितसिंह घाटगे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. घाटगे यांनी पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. कागलची जागा शिवसेनेकडेच राहिल्यानं घाटगे बंडखोरीच्या तयारीत आहेत.

शिवसेनेचा एबी फॉर्म मिळाल्याने संजय घाटगे गटात उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे राजे गटात मात्र निराशा पसरली आहे. भाजपने कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेकडे असलेल्या 2 जागांची मागणी केली होती. यामध्ये चंदगड आणि कागलच्या जागांचा समावेश होता. विशेषतः कागलच्या जागेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील आग्रही होते.

यामुळे कागलची जागा भाजपला जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. त्यामुळेच भाजपकडून इच्छुक असलेले पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या प्रचाराचा शुभारंभ देखील केला. मात्र, याच मतदारसंघातून शिवसेनेचे संजय घाटगे देखील इच्छुक होते.

मागील विधानसभा निवडणुकीत संजय घाटगे यांना केवळ 5 हजार मतांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्यांनी यावेळी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतली होती. म्हणूनच ही जागा भाजपला जाणार की शिवसेनेला याबाबत कमालीची उत्सुकता होती. त्यातच काल शिवसेनेने या मतदारसंघात संजय घाटगे यांना एबी फॉर्म दिला.

संबंधित बातम्या 

संजय घाटगेंच्या एबी फॉर्मने कोल्हापुरात भाजपला धक्का, राजे गटात अस्वस्थता  

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI