AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नुसती चर्चा नाही, निर्णयही झाला, जमीनही मिळाली, ठाकरे सरकारचं जाहीर कौतुक : संभाजीराजे

लोकराजा छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj Jayanti) यांच्या जयंतीनिमित्त सारथी संस्थेच्या कोल्हापूरमधील उपकेंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झालं.

नुसती चर्चा नाही, निर्णयही झाला, जमीनही मिळाली, ठाकरे सरकारचं जाहीर कौतुक : संभाजीराजे
खासदार संभाजी छत्रपती
| Edited By: | Updated on: Jun 26, 2021 | 1:25 PM
Share

कोल्हापूर : लोकराजा छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj Jayanti) यांच्या जयंतीनिमित्त सारथी संस्थेच्या कोल्हापूरमधील उपकेंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झालं. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, (Sambhajiraje Chhatrapati) त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराज, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे उपस्थित होते. या उद्घाटन कार्यक्रमानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी ठाकरे सरकारचं जाहीर कौतुक केलं. केवळ चर्चा न करता निर्णयही झाला, सारथी उपकेंद्राला जमीन मिळाली, त्याबद्दल ठाकरे सरकारचे कौतुक आणि आभार मानतो असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. (Sambhajiraje Chhatrapati appreciate CM Uddhav Thackeray MVA sarkar after sarthi sanstha gets land on Shahu Maharaj Jayanti today)

“सारथीच्या उद्घाटनावेळी 4 वर्षापूर्वी मी उपस्थित होतो. सारथीला स्वायत्तता राहायला हवी ही आमची मागणी होती. एका अधिकाऱ्यामुळे ती गेली होती. चर्चा असो की संघर्ष आम्ही सर्व केलं. महाविकास आघाडी सरकार असो, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. आरक्षणाचा लढा सुरुच राहील, वर्ष लागेल दोन वर्ष लागेल. पण समाजाला सक्षम करायचं असेल तर सारथी संस्था स्वत:च्या पायावर उभी राहणं आवश्यक आहे. त्यासाठीच तिची स्थापना झाली. परवा माझी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राजे आम्ही तुमच्यासोबत आहोत, दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात बैठक घेतली, त्यात बहुतेक प्रश्न निकाली लागले” असं संभाजीराजे म्हणाले.

सरकारचं कौतुक आणि आभार

प्रामुख्याने शाहूंच्या कर्मभूमीत सारथीचं उपकेंद्र देण्याचा निर्णय घेतला, केवळ निर्णय झाला नाही तर दोन सव्वा दोन एकर जमीन आणि इमारत हस्तांतरही झाली. मी आज सरकारचं कौतुक आणि आभार मानले. मी सांगितलं सारथीला अद्ययावत संशोधन केंद्र करायचं असेल तर त्यासाठी किमान पाच एकर जमीन हवी. मला विश्वास आहे सुरुवात चांगली झाली आहे, यापुढेही चांगलं काम होईल आणि खऱ्या अर्थाने शाहूंचा विचार सर्वदूर पोहोचेल, असं संभाजीराजे यांनी सांगितलं.

VIDEO : संभाजीराजे छत्रपती नेमकं काय म्हणाले? 

संबंधित बातम्या  

एकटा संभाजी काय करेल, 48 खासदारांनी ताकद द्या, वडील शाहू महाराजांचं पुत्रप्रेम कोल्हापूरकरांनी पाहिलं!

OBC आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? फडणवीस म्हणाले, ‘लिहून घ्या, 2 नावं सांगतो!’

संजय राऊत मातोश्रीवर, मुख्यमंत्र्यांना भेटताय का? राऊत म्हणाले शिवसेना पक्षप्रमुखांना भेटतोय!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.