“केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालय खिशात असल्याच्या भूमिकेत, न्यायासाठी कोणाच्या दारात जायचं?”

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केलाय. मोदी सरकार सर्वोच्च न्यायालयाचंही ऐकायला तयार नाही. ते सध्या सर्वोच्च न्यायालय देखील खिशात असल्याच्या भूमिकेत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालय खिशात असल्याच्या भूमिकेत, न्यायासाठी कोणाच्या दारात जायचं?
संजय राऊत आणि नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 1:10 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केलाय. मोदी सरकार सर्वोच्च न्यायालयाचंही ऐकायला तयार नाही. ते सध्या सर्वोच्च न्यायालय देखील खिशात असल्याच्या भूमिकेत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच पेगाससचा विषय गंभीर आहे असं सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल, तर आम्ही न्यायासाठी कोणत्या न्यायालयात जायचं, असा सवाल राऊत यांनी केलाय. ते माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “विरोधी पक्ष काय सांगतो, त्यांच्याकडे काय माहिती आहे, सरकारकडे काय माहिती आहे, यावर चर्चा झाली तर हा विषय किती गंभीर आहे हे समजेल. पण सरकार सर्वोच्च न्यायालयाचंही ऐकत नसेल तर हे सरकार या देशातील चारही प्रमुख स्तंभ मोडित काढायला निघालं आहे. कुणाच्याही संदर्भात सरकारची भूमिका प्रामाणिकपणाची नाही. जर सर्वोच्च न्यायालयाचंही ऐकायला सरकार तयार नसेल, तर सर्वोच्च न्यायालय आमच्या खिशात आहे या भूमिकेत सरकार आहे. पेगाससचा विषय गंभीर आहे हे न्यायालय म्हणत असेल तर यासाठी अजून कोणत्या न्यायालयात आम्ही जायचं?”

“सरकार देशातील चारही प्रमुख स्तंभ मोडित काढायला निघालंय”

“पेगासस हे गंभीर प्रकरण असल्याचं खुद्द सर्वोच्च न्यायालयानेही म्हटलं असून त्यावर कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे. मात्र, केंद्र सरकार त्यावर चर्चा करायला तयार नाही. हे सरकार सर्वोच्च न्यायालयाचं ऐकत नाही. हे सरकार देशातील चारही प्रमुख स्तंभ मोडित काढायला निघालं आहे,” असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी केंद्रावर चढवला.

“कृषी कायद्यावरही चर्चा नाही”

आज आम्ही शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आज जाऊ. आज बैठक आहे. त्यात ठरेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही सरकार बोलू देत नाही. त्याबाबत शेतकऱ्यांसमोर ही गोष्ट मांडू. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आमच्याकडून दुर्लक्षित झालेला नाही. कृषी कायदा आणि पेगाससबाबत आमच्या घोषणा संसदेत होत आहेत. कृषी कायद्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही नोटिसा दिल्या. पण त्या फेटाळण्यात आल्या आहेत. हे दुर्देव आहे, असं ते म्हणाले.

“महापालिकेवर भगवा कायम राहील”

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज मनसे अध्यक्षव राज ठाकरे यांना भेटणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मी दिल्लीत आहे. पेगासस किंवा स्पाय यंत्र आम्ही काही कुणाच्या पाळतीवर ठेवलेलं नाही. कोण कुणाला भेटतं, कोण कुठं चाललंय… ही काय आमची भूमिका नाही. आमच्याकडे काही पेगासस नाही. तुम्ही सांगताय माहिती आहे. पण इथं कुणी कुणावर भेटण्यावर बंधन नाही. केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून पाळत ठेवली जात आहे. आम्ही ठेवत नाही. कोणीही कुणाला भेटू शकतो,” असंही राऊत म्हणाले.

“या देशात अजूनही लोकशाही असं आम्ही मानतो. ती राहिली पाहिजे असं आम्हाला वाटतं. आमच्यावर पेगाससद्वारे पाळत ठेवली जात आहे. आम्ही दुसऱ्यांवर पाळत ठेवत नाही. महाराष्ट्राचे राजकारण पारदर्शक असते. अनेक लोक एकमेकांना भेटत असतात, असं ते म्हणाले. विरोधक मुंबईत ताकद अजमावत असेल तर अजमावली पाहिजे. महापालिकेवरील भगवा हा व्यक्तिगत स्वरुपाचा नाही. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. तो तसाच राहणार,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

हेही वाचा :

केंद्र सरकार चारही स्तंभ मोडित काढायला निघालंय; राऊतांचा घणाघाती हल्ला

घटनात्मक पेचप्रसंग राजभवनातच, त्यांचे बोलविते धनी कोण?; संजय राऊत यांचा सवाल

केंद्रीय मंत्रिमंडळाचा अर्धवट निर्णय, 50 टक्क्यांच्या मर्यादेवर 102 वी घटनादुरुस्ती निरुपयोगी : संजय राऊत

व्हिडीओ पाहा :

Sanjay Raut criticize central government over pegasus spyware and Phone tapping supreme court

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.