घटनात्मक पेचप्रसंग राजभवनातच, त्यांचे बोलविते धनी कोण?; संजय राऊत यांचा सवाल

12 राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. (sanjay raut slams governor bhagat singh koshyari over 12 MLC Nominations)

घटनात्मक पेचप्रसंग राजभवनातच, त्यांचे बोलविते धनी कोण?; संजय राऊत यांचा सवाल
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 10:30 AM

नवी दिल्ली: 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राज्यपालांनी 12 सदस्यांची अजूनही नियुक्ती केलेली नाही. त्यावर त्यांनी बोलायला हवं. घटनेनुसार या नियुक्त्या वेळेतच व्हायला हव्यात. खरं तर राजभवनातच घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यांचे बोलविते धनी कोण आहेत, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. (sanjay raut slams governor bhagat singh koshyari over 12 MLC Nominations)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना हा सवाल केला. 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यावर त्यांनी बोलायला हवं होतं. त्याबाबत त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे? 12 जागा रिकाम्या ठेवून तुम्ही महाराष्ट्रावर, आमदारांवर आणि विधीमंडळावर अन्याय करत आहात. ज्याचं ते काम आहे ते त्यांनी करावं. राजभवनातून राज्य सरकारच्या कामाची माहिती घेणं. सरकार घटनेप्रमाणे काम करतं की नाही ते पाहणं हे राज्यपालांचं काम आहे. राज्यात घटनात्मक पेचप्रसंग जेव्हा निर्माण होतो. तेव्हा खरं राज्यपालांचं काम असतं. महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झालेला नाही. घटनात्मक पेच प्रसंग राजभवनातच निर्माण झालेला आहे. १२ आमदारांच्या नियुक्त्या या घटनेनुसार वेळेत करणं गरजेचं आहे. मंत्रिमंडळाने शिफारस केल्या आहेत. तरीही राज्यपाल घटनात्मक चौकटीत त्या मान्य करायला तयार नसतील तर त्यांनी घटनात्मक पेचप्रसंग राज्यपाल आणि त्यांचे बोलविता धनी करत आहेत, अशी टीका राऊतांनी केली आहे.

चारही स्तंभ मोडित काढायला निघालेत

यावेळी त्यांनी पेगाससच्या मुद्द्यावरून भाजपवर पुन्हा हल्ला चढवला. विरोधी पक्ष काय सांगतो, त्यांच्याकडे काय माहिती आहे, सरकारकडे काय माहिती आहे, यावर चर्चा झाली तर हा विषय किती गंभीर आहे हे समजेल. पण सरकार सर्वोच्च न्यायालयाचंही ऐकत नसेल तर हे सरकार या देशातील चारही प्रमुख स्तंभ मोडित काढायला निघालं आहे. कुणाच्याही संदर्भात सरकारची भूमिका प्रामाणिकपणाची नाही. जर सर्वोच्च न्यायालयाचंही ऐकायला सरकार तयार नसेल तर सर्वोच्च न्यायालय आमच्या खिशात आहे या भूमिकेत सरकार आहे. पेगाससचा विषय गंभीर आहे हे न्यायालय म्हणत असेल तर यासाठी अजून कोणत्या न्यायालयात आम्ही जायचं?, असा सवाल त्यांनी केला.

आंदोलक शेतकऱ्यांना भेटणार

आज आम्ही शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आज जाऊ. आज बैठक आहे. त्यात ठरेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही सरकार बोलू देत नाही. त्याबाबत शेतकऱ्यांसमोर ही गोष्ट मांडू. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आमच्याकडून दुर्लक्षित झालेला नाही. कृषी कायदा आणि पेगाससबाबत आमच्या घोषणा संसदेत होत आहेत. कृषी कायद्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही नोटिसा दिल्या. पण त्या फेटाळण्यात आल्या आहेत. हे दुर्देव आहे, असं ते म्हणाले.

कोणीही कुणाला भेटू शकतो

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज मनसे अध्यक्षव राज ठाकरे यांना भेटणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी दिल्लीत आहे. पेगासस किंवा स्पाय यंत्र आम्ही काही कुणाच्या पाळतीवर ठेवलेलं नाही. कोण कुणाला भेटतं, कोण कुठं चाललंय… ही काय आमची भूमिका नाही. आमच्याकडे काही पेगासस नाही. तुम्ही सांगताय माहिती आहे. पण इथं कुणी कुणावर भेटण्यावर बंधन नाही. केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून पाळत ठेवली जात आहे. आम्ही ठेवत नाही. कोणीही कुणाला भेटू शकतो. या देशात अजूनही लोकशाही असं आम्ही मानतो. ती राहिली पाहिजे असं आम्हाला वाटतं. आमच्यावर पेगाससद्वारे पाळत ठेवली जात आहे. आम्ही दुसऱ्यांवर पाळत ठेवत नाही. महाराष्ट्राचे राजकारण पारदर्शक असते. अनेक लोक एकमेकांना भेटत असतात, असं ते म्हणाले. विरोधक मुंबईत ताकद अजमावत असेल तर अजमावली पाहिजे. महापालिकेवरील भगवा हा व्यक्तिगत स्वरुपाचा नाही. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. तो तसाच राहणार, असंही त्यांनी सांगितलं. (sanjay raut slams governor bhagat singh koshyari over 12 MLC Nominations)

संबंधित बातम्या:

केंद्रीय मंत्रिमंडळाचा अर्धवट निर्णय, 50 टक्क्यांच्या मर्यादेवर 102 वी घटनादुरुस्ती निरुपयोगी : संजय राऊत

पेगसस प्रकरणातील आरोप गंभीर, सत्य बाहेर यायला हवं : सर्वोच्च न्यायालय

Maharashtra News LIVE Update | “महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा दौरा पेगसस स्पायवेअर संदर्भात होता का?”

(sanjay raut slams governor bhagat singh koshyari over 12 MLC Nominations)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.