AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही चार द्या, पण दोन घ्यायची तयारी ठेवायलाच हवी – राऊत

राज्य मिळाले आहे ते नीट चालवा! शेळ्यांवर राज्य करणे सोपे असते", अशा शब्दात सामनातून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

तुम्ही चार द्या, पण दोन घ्यायची तयारी ठेवायलाच हवी - राऊत
| Updated on: Dec 28, 2020 | 6:55 AM
Share

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये आपल्याला दिल्लीतील काही लोक सतत टोमणे मारत असल्याचं, आपल्या अपमान करत असल्याचं म्हटलं होतं. त्यांना आपल्याला लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 72व्या मन की बातमध्ये म्हणाले. तोच धागा पकडत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पर्यायानं पंतप्रधान मोदी यांना सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टोला लगावला आहे. (Sanjay Raut criticize PM Narendra Modi in Samaana editorial )

“राजकारणात दोन घ्यावे आणि दोन द्यावेत. भाजपची ताकद मोठी असल्याने तुम्ही चार द्यावेत. पण कधीतरी दोन घ्यावेच लागतील आणि सत्ताधाऱ्यांनी याची तयारी ठेवायलाच हवी. मोदी सरकारचे भाग्य असेल की, आज विधी बाकांवर मधु लिमये, मधु दंडवते, लोहिया, जनेश्वर मिश्र नाहीत. चंद्रशेखर, इतकेच काय लालू यादव, येचुरीदेखील नाहीत. नाहीतर टोले आणि टोमणे म्हणजे काय याचा प्रत्यय आलाच असता. राज्य मिळाले आहे ते नीट चालवा! शेळ्यांवर राज्य करणे सोपे असते”, अशा शब्दात सामनातून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

प्रबळ विरोधी पक्ष शिल्लक ठेवला आहे काय?

“दिल्लीतील काही लोक मला सतत टोमणे मारत असतात व माझा अपमाम करतात. त्यांना मला लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत, असे मोदी यांनी सांगितले आहे ते धक्कादायक आहे. आपल्या पंतप्रधानांचा अपमान कोण करीत आहे? पंतप्रधानांच्या अपमान करण्याइतका प्रबळ विरोधी पक्ष विद्यमान राज्यकर्त्यांनी शिल्लक ठेवला आहे काय? काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वास आपण गांभीर्याने घेत नसल्याचं भाजपच्या नेत्यांनी एकीकडे सांगायचं आणि त्याच वेळी राहुल गांधी आमचा अपमान करतात, असे दुसऱ्या तोंडाने बोलायचे हे पांचट विनोदाचे लक्षण आहे. विधायक टीका करणे, सरकारच्या खोटेपणावर बोलणे यास राज्यकर्ते अपमान म्हणत असतील तर लोकशाहीचा अंतकाळ जवळ आला आहे”, असा सूचक इशाराही सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आलाय.

दुखणे पोटाला आणि प्लास्टर पायाला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या लोकशाहीचे रखवालदार आहेत. त्यांच्या भाषेत ते प्रधानसेवक किंवा चौकीदार आहेत. सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर केल्या, त्या चांगल्याच आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात काल 18 हजार कोटी रुपये जमा केले. तरीही दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी असंतुष्ट असेल तर त्याची वेदना वेगळी आहे. खरे सांगायचे तर आपल्या पंतप्रधानांना शेतकऱ्यांची जखमही माहीत आहे आणि उपचारही माहीत आहे, पण मोदी यांची तऱ्हा अशी की, दुखणे पोटोला आणि प्लास्टर पायाला. सरकार किंवा राजा करतो, ते सर्व बरोबर या भूमिकेत आजचे सरकार आहे, याला अर्थ नाही. सध्याच्या रहाजवटीत लोकांच्या शेळ्या झाल्या आहेत. शेळ्या झालेले एकमेकांना सांगत आहेत की, ‘मेंढपाळाने छान व्यवस्था केली.’

तपास यंत्रणांवरुनही टोला

पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना कोण कशाला टोणे मारतील? त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यांचे राज्य बहुमतावर सुरु आहे. सीबीआय, ईडी, आयकर विभाग हे त्यांच्या बहुमताचे रखवालदार आहेत, तोपर्यंत चिंता करण्याचे कारण नाही. त्यामुळे टोमणे वगैरेची चिंता का करता? मोदी हे जागतिक स्तरावरील मोठे नेते आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी मारलेल्या टोमण्यांची दखल घेण्याची त्यांना गरज नाही, असा खोचक सल्लाही संजय राऊत यांनी सामनाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना देऊ केला आहे.

संबंधित बातम्या:

जे महाराष्ट्रात घडत होतं, तेच बंगालमध्ये? शाहांची स्ट्रॅटेजी, भाजपात धूसफुस?

‘शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी पंतप्रधान टीव्हीवर भाषणबाजी करताहेत’, ममता बॅनर्जींचा घणाघात

Sanjay Raut criticize PM Narendra Modi in Samaana editorial

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.