AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान देशापासून काय लपवतायत? तवांगमध्ये 8 दिवसांपूर्वीच घुसखोरी, सत्य बाहेर का येऊ देत नाहीत, संजय राऊत यांचा सवाल

पाकिस्तान, चीन हे देशाचे दुश्मन सीमांवरती धडका मारतायत. प्रधानमंत्र्यांनी देशापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केलाय, हे तवांगवरून दिसून येतंय, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.

पंतप्रधान देशापासून काय लपवतायत? तवांगमध्ये 8 दिवसांपूर्वीच घुसखोरी, सत्य बाहेर का येऊ देत नाहीत, संजय राऊत यांचा सवाल
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Dec 13, 2022 | 10:19 AM
Share

नवी दिल्लीः भारत-चीन सीमेवर (India China) आठ दिवसांपूर्वीच चीनने घुसखोरी केली. मात्र केंद्र सरकारचा गुजरातमध्ये तेव्हा राजकीय उत्सव सुरु होता. इकडे देशाच्या सीमा उघड्या पडल्या. तवांगमध्ये (Tawang) दुश्मनाने घुसखोरी केली. देशाच्या सीमा केंद्र सरकारसाठी किती महत्त्वाच्या आहेत, हे यावरून लक्षात येतं, असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय.

तर तवांगमध्ये आठ दिवसांपूर्वीच घुसखोरी झाली असताना गुजरात निवडणुकांसाठी हे सत्य लपवलं गेलं, पंतप्रधानांनी देशापासून एवढी मोठी घटना का दडवली, असा सवाल संजय राऊत यांनी केला. दिल्लीत आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी चीनच्या घुसखोरीवर भाष्य केलं.

राऊत म्हणाले, ‘ लडाखमधून चिनी सैन्य बाहेर काढलं, चर्चा झाली, मग ते तवांगमध्ये घुसलं. देशाच्या राज्यकर्त्यांनी राजकारणातलं लक्ष कमी करून देशाच्या सीमांवर लक्ष द्यावं. चीनसारखा शत्रू तिन्ही बाजूंनी घुसतोय, यावर लक्ष दिलं तर खऱ्या अर्थानं राष्ट्राची सेवा होईल. आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न लावून धरणार आहोत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

पाकिस्तान, चीन हे देशाचे दुश्मन सीमांवरती धडका मारतायत. प्रधानमंत्र्यांनी देशापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केलाय, हे तवांगवरून दिसून येतंय. आठ दिवसांपूर्वी ही घडना घडली, जखमी सैनिक गुवाहटीत उपचार घेत आहेत. हे का लपवलं गेलं? दोन्ही बाजूंचे सैनिक किती जखमी झाले? शहीदही झालेत का? याविषयी अधिकृत माहिती सरकार द्यायला तयार नाही…

1961 च्या चीनी सैन्य तवांगच्या पुढे आलं होतं. स्थानिकांनी चिनी सैनिकांशी युद्ध करून तवांग देशात टिकवून ठेवलंय. मात्र आज केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे भारत चीन सीमेवर तणाव वाढला आहे. तवांगची घटना ९ डिसेंबर रोजी घडली असताना आता ती का उघड झाली? या प्रश्नाचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांनी द्यावं, आपलं आंतरराष्ट्रीय धोरण चुकत आहे का, असा सवाल राऊत यांनी केलाय.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.