VIDEO: दोन-चार पादरेपावटे फुसफुसले म्हणजे सरकारला आग लागत नाही, राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून विरोधकांनी सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांची पिसे काढली आहेत.

VIDEO: दोन-चार पादरेपावटे फुसफुसले म्हणजे सरकारला आग लागत नाही, राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल
sanjay raut
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 3:58 PM

पणजी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून विरोधकांनी सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांची पिसे काढली आहेत. दोन-चार पादरेपावटे फुसफुसले म्हणजे सरकारला आग लागत नाही, असा हल्लाबोलच शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीव्ही9 मराठीशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी गोव्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगापासून ते महाराष्ट्रातील राजकारणापर्यंतच्या विविध प्रश्नांची त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. आघाडी सरकार स्थिर राहणार का? याबाबत चर्चा सुरू आहे, याविषयी विचारताच, विरोधी पक्षातील दोन चार पादरे पावटे फुसफूसले म्हणून काय या सरकारला आग लागत नाही. पक्षातले आणि सरकारमधले यात फरक असतो, असं राऊत म्हणाले.

शिवसेनेची हळद लागायची आहे

शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनीही मुख्यमंत्रीपदावरून भाष्य केलं होतं. त्यावरही राऊतांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सत्तार शिवसेनेत नवे आहेत. त्यांना शिवसेनेची हळद लागायची आहे. अनेकांना शिवसेना हा पक्ष समजून घ्यायला वेळ लागतो. माझ्या सारखा माणूस जन्मताच पक्षात आहे. मला काय बोलायचं यासाठी मार्गदर्शन घ्यायची गरज पडत नाही. जे सेनेत जन्माला आले नाहीत त्यांना किमान पुढची 20 वर्ष शिवसेनेत घालवावी लागतील. मग त्यांनी सेनेतील घडामोडीविषयी बोलले पाहिजे. सत्तार काँग्रेसमधून आले आहेत. हळूहळू रुळत आहेत. लोकप्रिय होत आहेत. पण अशाप्रकारे विधान करून अकारण विरोधी पक्षाच्या हातात कोलीत मिळेल, वाद निर्माण होतील असं कोणी करू नये. असं करताना तसंही कोणी दिसत नाही. आमचा सर्वांचा विश्वास उद्धव ठाकरेंवर आहे. तेच नेतृत्व राज्याला पुढे घेऊन जाईल, असं राऊत म्हणाले.

दिल्लीची व्यवस्था कामच करू देत नाही

मुख्यमंत्र्यांवर काही वैद्यकीय बंधनं आहेत. ती पूर्ण काळ राहत नाहीत. हळूहळू त्यातून माणूस उभा राहतो आणि काम करतो. देशाच्या राजकारणात अनेक धडधाकट माणसं आहेत. ते काहीच काम करत नाहीत. त्यांना दिल्लीतील व्यवस्था काहीच काम करू देत नाही. त्यांच्याविषयी काय म्हणणार. त्या मानाने महाराष्ट्रात गोंधळ का निर्माण करता? असा सवाल त्यांनी केला.

लकवा मारला म्हणजे काय हे केंद्राकडे पाहा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे सर्व मिळून काम करत आहेत. चिंता करू नका. भाजपने शब्दांचे किती बार फोडले तरी सरकारचा बालही बाका होणार नाही. बोलत राहा. तुम्ही कितीही बोलत राहिला याला लकवा मारला, त्याला लकवा मारला, त्याला लकवा मारला अरे… लकवा मारलाय म्हणजे काय? जे काय पाहायचं असेल तर केंद्राकडे जाऊन पाहिलं पाहिजे. त्यांची कामाची पद्धत काय आहे? असा सवाल त्यांनी केला.

राज्यपालांनी राजीनामा देऊन बोलावं

राज्यपालाच्या पदावरील व्यक्तीने मर्यादा पाळल्या पाहिजे. मग ते मेघालयाचे असो महाराष्ट्राचे असो की पश्चिम बंगालचे. त्यांनी काही अद्वातद्वा बोललं की आम्ही त्यांचं समर्थन करणार नाही. महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी एक भूमिका आणि मेघालयाच्या राज्यपालांबाबतची दुसरी भूमिका असं आम्ही करणार नाही. राज्यपालांनी घटनेचं आणि पदाचं पालन केलं पाहिजे. राजकीय विधान करायचं असेल तर राजीनामा देऊन बोललं पाहिजे. सत्यपाल मलिक बोलले ते चुकीचं आहे. ती बंददाराआडची चर्चा होती. पंतप्रधानांचं म्हणणं आवडलं नसेल आणि सार्वजनिक ठिकाणी त्यावर बोलायचं असेल तर राज्यपाल मलिक यांनी राजीनामा देऊन बोललं पाहिजे. राज्यपालांनी वादग्रस्त वर्तन करू नये. खरं तर मलिक यांचं विधान आमच्या सोयीचं आहे. पण आमच्या सोयीचं विधान आहे म्हणून आम्ही समर्थन करणार नाही. त्यांना बोलायचंच तर राजीनामा देऊन बोलावं, असंही ते म्हणाले.

मग एसआयटी नेमा

नारायण राणेंना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे. पण मर्यादा पाळल्या पाहिजे. राणेंनी हातात लेखणी घेऊन काही मतं मांडली असेल तर लोकशाहीत आदर केलाच पाहिजे. फक्त तुम्ही खून करू नका. हातात लेखनी जरुर घ्या, पण चाकू, तरवारी बंदुका घेऊन राजकीय विरोधकांचे मुडदे जोपर्यंत पाडत नाहीत तोपर्यंत आम्ही तुमच्या टिकेचा सन्मान करू. राणे 25 वर्ष सेनेतच होते. श्रीधर नाईक, अंकूश राणे, सत्यविजय भिसे, कालपरवा संतोष परब यांच्याबाबतीत काय झालं. मी तर म्हणेल केंद्रीय गृहमंत्रालयाने एसआयटी नेमावी. दहशतवादाबाबत कुणाला काही प्रश्न पडले असेल तर राणेंनी शहांकडे मागणी करावी. आम्हाला अडचण नाही. सिंधुदुर्गच काय राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात राजकीय दहशतवाद असूच नये. राजकारणात एक मोकळेपणा असला पाहिजे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

कोकणातील राजकीय दहशतवादाची चौकशी करण्यासाठी शहांनी एसआयटी नेमावी, राऊतांचा राणेंना टोला

Sanjay Raut| गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग व्हावा ही राहुल-प्रियांका यांची इच्छा, पण…; संजय राऊतांचं मोठं विधान

मुख्यमंत्रीपदासाठी रश्मी ठाकरेंच्या नावाची चर्चा, उद्धव ठाकरे राहणार की जाणार? संजय राऊत म्हणतात…

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.