एक गोष्ट चुकीची घरात CCTV, शिसराटांचा व्हिडीओ व्हायरल होताच अंजली दमानियांचं खुलं आव्हान; काय म्हणाल्या?
मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक बॅग दिसत असून ती पैशांनी भरलेली असल्याचे सांगितले जात आहे.

Sanjay Shirsat Viral Video : सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते बनियवर बसलेले असून त्यांच्या बाजूला त्यांचा आवडता कुत्रा आहे. सोबतच या व्हिडीओमध्ये पैशांनी भरलेली एक बॅग असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर ठाकरे गटाने एवढे सारे पैसे नेमके कुठून आले, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील हे व्हायरल व्हिडीओ ट्वीट करून शिरसाट यांना थेट आव्हान दिले आहे.
अंजली दमानिया यांनी काय म्हटलंय?
अंजली दमानिय यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडीओवर भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी हा व्हिडीओही शेअर केला आहे. मला संजय शिरसाटांची कमाल वाटते. बॅगमध्ये चक्क पैसे दिसत असताना ते पैसे नाहीत, कपडे असतील असे ते म्हणूच कसे शकतात? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे. तसेच मी त्या व्हिडीओला झूम करून फोटो काढला आहे, असं म्हणत व्हिडीओत दिसत असलेल्या बॅगेत पैसेच आहेत, असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.
त्यांच्यात हिंमत असेल आणि ते…
तो व्हिडीओ माझ्या घरातील आहे, असे संजय शिरसाट म्हणत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल आणि ते खरं बोलत असतील तर आजच्या आज त्यांनी त्यांच्या घरी माध्यमांना घेऊन जावं आणि व्हिडीओमध्ये जी रूम दिसत आहे ती खरच त्यांच्या घरातील आहे का? हे दाखवून द्यावे, असे खुले आव्हानही दमानिया यांनी शिरसाट यांना केले.
एक गोष्ट चुकीची वाटते की….
सोबतच, मला यात फक्त एक गोष्ट चुकीची वाटते की कोणाच्याही बेडरूममध्ये CCTV लावणे अतिशय चुकीचे आहे, असं मतही दमानिया यांनी व्यक्त केलं.
मला संजय शिरसाटांची कमाल वाटते. बॅग मधे चक्क पैसे दिसत असतांना, ते पैसे नाही, कपडे असतील असे शिरसाट म्हणूच कसे शकतात ? मी त्या विडिओला झूम करून फोटो काढला आहे.
“हा माझ्या घरच्या वीडियो आहे “ असे ते म्हणत आहेत… त्यांच्यात हिम्मत असेल आणि ते खरं बोलत असतील तर आजच्या आज त्यांनी… pic.twitter.com/ZluMlMLf2A
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) July 11, 2025
संजय शिरसाट यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय?
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी माध्यमांपुढे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत जी बॅग दिसत आहे, तिच्यात पैसे नाहीत. त्या बॅगेत कपडे आहेत. मी बनियनवर बसलेला आहे. माझ्या बाजूला माझा लाडका कुत्रा आहे, याचा अर्थ मी बाहेरून आलो आहे. संजय राऊत काहीही खोटे आरोप करत आहेत. त्यांच्या दाव्यांत काहीही तथ्य नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय.
