कोल्हापूरची भूमी सोडून पुण्याला गेलेल्या चंद्रकांत पाटलांनी बारा वर्ष पाट्या टाकल्या, सतेज पाटलांचा घणाघात

कोल्हापूरची भूमी सोडून पुण्याला गेलेल्या चंद्रकांत पाटील यांनी बारा वर्षे पाठ्या टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात मते मागण्याचा अजिबात अधिकार नाही, असा घणाघात पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला.

  • साईनाथ जाधव, टीव्ही 9 मराठी, इचलकरंजी
  • Published On - 15:40 PM, 28 Nov 2020
chandrakant patil And satej patil

इचलकरंजी : सद्यस्थितीत भाजप फक्त राजकारण करत असून कोल्हापूरची भूमी सोडून पुण्याला गेलेल्या चंद्रकांत पाटील यांनी बारा वर्षे पाठ्या टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून त्यांना जिल्ह्यात मते मागण्याचा अजिबात अधिकार नाही, असा घणाघात पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. (Satej Patel Criticized Chandrakant patil)

हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येखे पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार डॉ. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या मेळाव्यात पालकमंत्री सतेज पाटील बोलत होते.

“राज्यात महाआघाडीचे सरकार हे कुणाला संपण्यासाठी नाही तर सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी अस्तित्वात आलं आहे. राज्य सरकार मराठा आरक्षण आणि वीज बिलाबाबत गंभीर असून हे प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असं सांगत कोल्हापूरची भूमी सोडून पुण्याला गेलेल्या चंद्रकांत पाटील यांनी बारा वर्षे पाठ्या टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली”, अशी टीका सतेज पाटील यांनी केली.

“जातीयवादी भाजपाला दूर ठेवण्यासाठी या दोन्ही निवडणूका महत्त्वाच्या आहेत. पदवीधर व शिक्षकांच्या अडचणी अरुण लाड व डॉ. जयंत आसगावकर हे प्रभावीपणे मांडू शकतात. त्यामुळे हातकणंगले तालुक्यात या दोघांना मताधिक्य देणार आहे”, असं आमदार राजूबाबा आवळे म्हणाले.

महाआघाडीच्या वतीने उत्कृष्ट काम सुरु असून करवीरनंतर हातकणंगले तालुक्यात मतदारसंख्या जास्त असल्यामुळे जितका निधी जास्त तितके मताधिक्य जास्त देणार असल्याचे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिले. .यावेळी हातकणंगले तालुक्यातील कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Satej Patel Criticized Chandrakant patil)

संबंधित बातम्या

चंद्रकांत पाटील लॉटरी लागून झालेले आमदार, दमछाक होऊन नवव्या फेरीत जिंकले : सतेज पाटील