अडवाणींना भाजपचा दुसरा दणका, आधी उमेदवारी रद्द आणि आता....

अडवाणींना भाजपचा दुसरा दणका, आधी उमेदवारी रद्द आणि आता....

नवी दिल्ली :  भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भाजपकडून दुसरा दणका बसला आहे. पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीचे त्यांचे तिकीट कापल्यानंतर आता हा दुसरा झटका अडवाणींच्या राजकीय वाटचालीचे भविष्य सांगण्यास पुरेसा आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपली स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपच्या मार्गदर्शन मंडळाचे सदस्य लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना मात्र स्थान मिळालेले नाही. अडवाणी यांचे लोकसभा तिकीट कापल्यानंतर आता कानपूरमधून खासदार असलेल्या मुरली मनोहर जोशींचेही तिकीट कापले जाणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे स्वतःहून निवडणूक लढवणार नसल्याचे जाहिर करणाऱ्या सुषमा स्वराज, उमा भारती आणि कलराज मिश्रा यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी जाहिर केलेल्या भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ, केशव प्रसाद मौर्य, उमा भारती, हेमा मालिनी, नितीन गडकरी आणि अरुण जेटली यांच्या नावाचा समावेश आहे. (पुढे वाचा)

दरम्यान, समाजवादी पक्षानेही अशाचप्रकारे आपली स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. मात्र, त्यात सपाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यांच्याच नावाचा समावेश नसल्याने बराच गदारोळ झाला. यानंतर सपाने आपली स्टार प्रचारकांची यादी अद्ययावत करत मुलायम सिंह यादव यांचे नाव यादीत समाविष्ट केले. मुलायम सिंह मैनपुरी मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *