उपमुख्यमंत्री माझ्या शब्दाबाहेर नाहीत, तर मुख्यमंत्री... : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये आयोजित महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या 56 व्या राज्यव्यापी अधिवेशनात जोरदार राजकीय टोलेबाजी केली.

उपमुख्यमंत्री माझ्या शब्दाबाहेर नाहीत, तर मुख्यमंत्री... : शरद पवार

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये आयोजित महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या 56 व्या राज्यव्यापी अधिवेशनात जोरदार राजकीय टोलेबाजी केली (Sharad Pawar on Uddhav Thackeray and Ajit Pawar). यावेळी त्यांनी एसटी कामगारांचे प्रश्न सोडवायचे असतील, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार महत्त्वाच्या व्यक्ती असल्याचं सांगितलं. तसंच उपमुख्यमंत्री माझ्या शब्दाबाहेर नाहीत, तर मुख्यमंत्री परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शब्दाबाहेर नसल्याचं मत व्यक्त केलं.

शरद पवार म्हणाले, “एसटी कामगारांचे प्रश्न सोडवायचे असतील, तर दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार महत्त्वाचे आहेत. मुख्यमंत्री हे अनिल परब यांच्या शब्दाबाहेर नाहीत आणि उपमुख्यमंत्री माझ्या शब्दाबाहेर नाहीत. त्यामुळे या दोघांचं नक्की जमेल. तुम्ही एसटी कामगारांच्या प्रश्नावर बैठक बोलवा. त्या बैठकीला मलाही बोलवा.”

एसटी कामगारांच्या प्रश्नांसाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी घ्या, मी उपमुख्यमंत्र्यांची घेतो, असं म्हणताच उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी बोलताना आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे आहे आणि सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी ते चांगलं काम करत असल्याचंही शरद पवार यांनी नमूद केलं. यावेळी शरद पवार यांनी मागील 4 वर्ष एसटी कामगारांच्या अधिवेशनाला उपस्थित न राहणाऱ्या दिवाकर रावते यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी राऊतांकडून जबाबदारी काढून परबांकडे दिली. त्यामुळे हा उत्साह दिसत असल्याचा टोला शरद पवारांनी लगावला.

एसटीला दरवर्षी 5 हजार कोटींचा संचित तोटा होतो. हे चित्र बदललं पाहिजे, अशी अपेक्षाही पवारांनी कामगारांसमोर बोलताना व्यक्त केली. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचं हे अधिवेशन कोल्हापुरातील तपोवन मैदानात झालं. याला शरद पवार यांच्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ, छगन कमळ बघ’, शरद पवार म्हणतात…

शरद पवार सिर्फ नामही काफी है, पवारांपुढे दिल्लीलाही झुकावं लागतं : संजय राऊत

ज्या झोपडीत शरद पवार जेवले, त्या झोपडीचा 15 दिवसात कायापालट

संबंधित व्हिडीओ:


Sharad Pawar on Uddhav Thackeray and Ajit Pawar

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *