AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाक द्या, मी मदतीसाठी तिथे असेन, पवारांचा शब्द

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जुने सहकारी संपतराव जेधे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

हाक द्या, मी मदतीसाठी तिथे असेन, पवारांचा शब्द
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Dec 16, 2020 | 9:35 PM
Share

पुणे :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जुने सहकारी संपतराव जेधे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या आंबवडे गावातील ग्रामस्थांची आज भेट घेऊन संपतरावांच्या निधनाबद्दल शरद पवार यांनी सहवेदना व्यक्त केल्या. यावेळी शरद पवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तसंच संपतरावाच्या कुटुंबीयांना कोणतीही अडचण आली तरी मी मदतीसाठी तत्पर असेन, असा शब्द पवार यांनी दिला. (Sharad Pawar emotional after the death of an old colleague Sampatrao jedhe)

“संपतराव माझ्यासोबतच 1978 साली आमदार झाले आणि त्यांनी सदैव मला साथ दिली. प्रसिद्धीपासून दूर राहून मला साथ आणि शक्ती देणारे असे जे सहकारी माझ्या पाठीशी भक्कमपणाने उभे राहिले त्यामध्ये संपतरावांचे स्थान अग्रभागी राहील. सत्ता असो वा नसो त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत मला साथ दिली”, अशा भावना व्यक्त करताना पवारांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

“संपतरावांनी सरकारकडे जे काही मागितले ते मतदारांसाठी, जनतेसाठी मागितले. स्वतःसाठी फक्त पंढरपूर मंदिराच्या कमिटीवर नेमण्याची इच्छा व्यक्त केली. तिथे पांडुरंगाची आणि उन्हातान्हात पंढरीला येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा घडावी, ही त्यांची मनोमन इच्छा होती”, अशा संपतरावांबद्दलच्या आठवणी पवारांनी जागवल्या.

“संपातरावांसारखी निस्वार्थी, जिवाभावाची माणसे हा आपला ठेवा असतात. संपतरावांच्या रूपाने हा ठेवा गेल्याचं मला दु:ख आहे. गावकऱ्यांना एवढेच सांगणे आहे की संपतरावाच्या कुटुंबाची त्यांनी काळजी घ्यावी. काहीही अडचणी आल्यास मला कळवावे, मी त्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असेन”, असा शब्द पवारांनी यावेळी दिला.

(Sharad Pawar emotional after the death of an old colleague Sampatrao jedhe)

हे ही वाचा

सैन्याचा ड्रेस बदलण्याच्या निर्णयावर राहुल गांधी भडकले; संरक्षण समितीतून वॉकआऊट

‘त्या’ 8 जिल्ह्यांतील सरपंच आरक्षण सोडत रद्दच !, नवा अध्यादेश जारी

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!