तुम्ही या सरकारचे ‘हेड मास्टर’ आहात की ‘रिमोट कंट्रोल’? संजय राऊत यांच्या प्रश्नांना शरद पवारांची रोखठोक उत्तरं

तुम्ही या सरकारचे 'हेड मास्टर' आहात की 'रिमोट कंट्रोल'? संजय राऊत यांच्या प्रश्नांना शरद पवारांची रोखठोक उत्तरं

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथॉन अडीच तास मुलाखत घेतली (Sharad Pawar interview by Sanjay Raut).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jul 11, 2020 | 9:23 AM

मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथॉन अडीच तास मुलाखत घेतली (Sharad Pawar interview by Sanjay Raut). यात त्यांनी शरद पवार यांना कोरोनापासून आघाडी सरकार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटासह अनेक प्रश्न विचारले. यावर शरद पवार यांनी रोखठोक उत्तरं दिली. यावेळी तुम्ही आघाडी सरकारचे हेड मास्टर आहात की रिमोट कंट्रोल असा प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी आपण या दोघांपैकी काहीही नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच अशा गोष्टी लोकशाहीत नसतात, असंही नमूद केलं.

शरद पवार म्हणाले, “मी आघाडी सरकारचा हेड मास्टरही नाही आणि रिमोट कंट्रोल देखील नाही. हेडमास्टर असला तर तो शाळेत असायला हवा. लोकशाहीत सरकार किंवा प्रशासन हे रिमोटने कधीही चालत नाही. जिथं लोकशाही नाही तिथंच रिमोट चालतं.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“आपण रशियाचं उदाहरण पाहिलं तर तेथे पुतीन 2036 पर्यंत रशियाचे अध्यक्ष राहणार आहेत. ही एकहाती सत्ताच आहे. लोकशाही वगैरे सर्वकाही बाजूलाच केले आहे. त्यामुळे आपण म्हणू तसे सरकार चालवले पाहिजे हा अट्टाहास आहे. इथं लोकशाही सरकार आहे आणि लोकशाहीचे सरकार कधीही रिमोट कंट्रोलवर चालू शकत नाही. मला ते मान्य नाही. सरकार मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळच चालवत आहे,” असंही ते म्हणाले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच एका मुलाखतीत केलेल्या सर्व आरोपांना देखील शरद पवार यांनी उत्तरं दिली. सरकार स्थापनेबाबत भाजपशी कधीच चर्चा झाली नाही. फडणवीस हे राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते. त्यांना काही माहित नाही, अस मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात पहिले दीड महिने मी घराच्या चौकचीबाहेरही गेलो नाही

शरद पवार यांनी आपल्या या मुलाखतीत लॉकडाऊनदरम्यानचे आपले अनुभव देखील सांगितले. ते म्हणाले, मी सुरुवातीचा महिना दीड महिना अक्षरशः माझ्या घराच्या चौकटी बाहेरही गेलो नाही. अगदी प्रांगणातही गेलो नाही. चौकटीच्या आतच होतो. एक तर घरातून दबाव होता. सर्व तज्ज्ञांनी 70 ते 80 वयोगटातील सर्वांनी अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे आणि या गटातील सर्वांना जास्त धोका आहे असं म्हटलं होतं. त्यामुळे काळजी घेण्याबाबत घरच्यांचा आग्रह होता. बराचसा वेळ टेलिव्हिजन, वाचन याच्याबाहेर काही दुसरं केलं नाही.”

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार व्हरांड्यात फेऱ्या मारत गीत रामायण ऐकत असल्याचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “लॉकडाऊनच्या काळात खूप गाणी ऐकली. भीमसेन जोशींचे सर्व अभंग ऐकले. हे अभंग दोन-तीन-चार नव्हे तर अनेकदा ऐकले. जुन्या काळात बिनाका गीतमाला असायची. आता ती नव्याने उपलब्ध आहे. त्याही पुन्हा पुन्हा ऐकण्याची संधी या निमित्ताने मिळाली. संपूर्ण गीत रामायण पुन्हा ऐकलं. ग दि माडगुळकरांनी देशाच्या विशेषतः महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या सांस्कृतिक विश्वात किती जबरदस्त कलाकृती निर्माण करु ठेवलीय याचा पुन्हा प्रत्यय घेतला.”

कोरोना संसर्ग येईल आणि त्यामुळे अशी स्थिती तयार होईल याची कधी कल्पनाही केली नव्हती असंही ते म्हणाले.

हेही वाचा :

धारावी झोपडपट्टीतील कोरोना संसर्गावर नियंत्रण, WHO कडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात तब्बल 7 हजार 862 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 5 हजार 366 रुग्णांना डिस्चार्ज

Pune Police | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची कडक कारवाई, 24 तासात 1,965 कारवाया

Sharad Pawar interview by Sanjay Raut

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें