सोनिया गांधींची भेट घेतली, महाराष्ट्राबाबत आमचं ठरलंय : शरद पवार

सचिन पाटील

|

Updated on: Nov 04, 2019 | 6:57 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar meet Sonia Gandhi) यांनी आज काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सोनिया गांधींची भेट घेतली, महाराष्ट्राबाबत आमचं ठरलंय : शरद पवार

Follow us on

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar meet Sonia Gandhi) यांनी आज काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत (Sharad Pawar meet Sonia Gandhi राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलही सोबत होते. शरद पवारांनी आपण पुन्हा सोनिया गांधी यांना भेटणार असल्याची माहिती यावेळी दिली. पुढच्या भेटीचं ठरलं आहे असं पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, “सोनिया गांधींशी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीविषयी माहिती देण्याचं ठरलं होतं. त्याप्रमाणे आज भेट घेऊन माहिती दिली. शिवसेना सातत्याने आपलं मुखपत्र सामनातून सातत्याने भाजपविषयी लिहीत आहे. आम्ही चर्चा करुन पुन्हा भेटण्याचं ठरवलं आहे”.

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन करण्यावर ही चर्चा झाली आहे. सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. मुंबईमधील नेत्यांशी चर्चा करून पुन्हा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. आम्हाला सरकार बनविण्यासाठी आमच्याकडे संख्या नाही, असं पवारांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं.

आम्ही भाजप-शिवसेनाविरोधात निवडणूक लढवली आहे. जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. संजय राऊत यांनी 175 जागांचं गणित कसं केलं हे माहिती नाही, आम्हाला कुणीही प्रस्ताव दिलेला नाही किंवा काही विचारलेलं नाही. आज महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठीचं संख्याबळ आमच्याकडे नाही. पुढे काय होतं ते पाहावं लागेल. सोनिया गांधींशी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीविषयी माहिती देण्याचं ठरलं. त्याप्रमाणे आज भेट घेऊन माहिती दिली, असं शरद पवार म्हणाले.

सत्ता स्थापनेवरुन भाजप-शिवसेनेत खडाजंगी

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 12 दिवस उलटले. मात्र, सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. बहुमत मिळवूनही भाजप-शिवसेना युतीने अजूनही सत्ता स्थापन केलेली नाही. दोन्ही पक्षांमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन खडाजंगी पाहायला मिळत आहे. मात्र, सत्ता स्थापनेला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या 9 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI