मंत्र्यांची कामगिरी ते मनपासाठी फिल्डिंग, राष्ट्रवादीची बैठक, सर्वात आधी शरद पवार हजर

राष्ट्रवादी काँग्रेसची आज एक महत्त्वाची बैठक पार पडत आहे. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडत आहे.

मंत्र्यांची कामगिरी ते मनपासाठी फिल्डिंग, राष्ट्रवादीची बैठक, सर्वात आधी शरद पवार हजर
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 5:10 PM

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसची आज एक महत्त्वाची बैठक पार पडत आहे. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडत आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सगळे मंत्री, नेते आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित आहेत. येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांचं प्लॅनिंग ते राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची कामगिरी यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. (Sharad Pawar meeting With  NCP Leaders over Mahapalika Election And performance of minister)

पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी स्वत: शरद पवार सर्वांत आधी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात हजर होते.  उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, नवाब मलिक, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे, खासदार श्रीनिवास पाटील असे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत.

राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता इथून पुढच्या काही महिन्यांत महापालिका निवडणुका होणार आहे. त्याच अनुषंगाने राजकीय पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीचे सरकारमधील साथीदार शिवसेना आणि काँग्रेसने काही महापालिका निवडणुका वेगळ्या लढणार असल्याचं सूतोवाच केलं आहे. त्यामुळे या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या रणनितीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते. तसंच महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने कोणत्या शहरांची जबाबदारी कोणच्या नेत्यांवर द्यायची, याचीही चर्चा होणे अपेक्षित आहे.

राष्ट्रवादीचे मंत्री दर आठवड्याला जनता दरबार घेत असतात. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून पवारांच्या सल्ल्यानुसार मंत्री दर आठवड्याला राष्ट्रवादी भवनमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध असतात. जनता दरबाराच्या माध्यमातून थेट मंत्री महोदय सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत असतात. एकंदरित गेल्या काही महिन्यांतली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची कामगिरी कशी आहे?, मंत्र्यांनी कोणकोणती कामे केली आहेत?, कोणती कामे दृष्टीक्षेपात आहेत? याची माहिती शरद पवार घेणार आहेत.

दुसरीकडे औरंगाबाद शहराच्या नामांतरवरुन महाराष्ट्रात जोरदार सामना रंगला आहे. विरोधी पक्ष भाजपने याच मुद्द्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडीला कोंडीत पकडलं आहे. दररोज आरोप प्रत्यारोपांची राळ उडत आहे. औरंगाबादचं नामांतर झालंच पाहिजे, अशी रोखठोक भूमिका सेनेने घेतली आहे. तर सरकार स्थापनेवेळी तयार केलेल्या कॉमन मिनिमम प्रोग्रामममध्ये हा मुद्दा नाही. त्यामुळे आमचा नामांतराला विरोध आहे, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे. दोन्ही पक्षांच्या भूमिका समोर असताना राष्ट्रवादीने अजूनही ठोस भूमिका घेतलेली नाही. या बैठकीत याही मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. (Sharad Pawar meeting With  NCP Leaders over Mahapalika Election And performance of minister)

हे ही वाचा

बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याच्या तयारीवर सोनिया गांधी नाराज : सूत्र

विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट अखेर जप्त, वडेट्टीवार म्हणतात…

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.