पवारांचं सतेज पाटलांवर कागलमध्ये भाष्य नाही, मात्र हातकणंगलेत जाऊन टीका

कोल्हापूर: तुमचं ठरलंय तर मी पण ध्यानात ठेवलंय, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला. हातकणंगले मतदारसंघात शरद पवार यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. कोल्हापुरात सतेज ऊर्फ बंटी पाटील आणि राष्ट्रवादीचे खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक हे एकमेकांचे हाडवैरी आहेत. […]

पवारांचं सतेज पाटलांवर कागलमध्ये भाष्य नाही, मात्र हातकणंगलेत जाऊन टीका
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

कोल्हापूर: तुमचं ठरलंय तर मी पण ध्यानात ठेवलंय, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला. हातकणंगले मतदारसंघात शरद पवार यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.

कोल्हापुरात सतेज ऊर्फ बंटी पाटील आणि राष्ट्रवादीचे खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक हे एकमेकांचे हाडवैरी आहेत. त्यांचा समेट घडवण्याचा बराच प्रयत्न झाला. मात्र त्याला सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय म्हणत धुडकावून लावलं. तोच धागा पकडत शरद पवार यांनी तुमचं ठरलंय तर मी पण ध्यानात ठेवलंय अशी टिप्पणी केली.

सतेज पाटील यांचा काल वाढदिवस होता. किमान त्यादिवशी तरी काहीतरी समेट होईल अशी आशा अनेकांना होती. मात्र बंटी पाटील शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्याच पाठीशी उभे असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे शरद पवारांनी ही टीका केली. पवारांची राजकीय खेळी सहसा समजत नाही असं बोललं जातंय. जर शरद पवारांना सतेज पाटलांबद्दल बोलायचंच होतं तर कागलच्या सभेत किंवा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात बोलायला हवं होतं. मात्र त्यांनी या मतदारसंघातून बाहेर पडल्यानंतर हातकणंगले मतदारसंघात जाऊन सतेज पाटलांवर टीका केली. त्यामुळे पवार इकडे न बोलता तिकडे का बोलले, असा प्रश्न आहे. आता कोल्हापुरात शरद पवार कोणता फासा टाकतात याकडं सगळ्यांचा नजरा लागल्या आहेत.

कोल्हापूरमधील लढत

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक विरुद्ध शिवसेनेकडून संजय मंडलिक यांच्यात लढत होत आहे. धनंजय महाडिक हे आघाडीचे उमेदवार असले, तरी त्यांचं काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्याशी वैर आहे. मात्र या मतदारसंघात सतेज पाटील यांची निर्णायक भूमिका राहणार आहे. कोल्हापूरमध्ये 23 एप्रिलला मतदान होत आहे. त्यामुळे मतदानापर्यंत कोण कुणाची मतं फोडतं याची चर्चा कोल्हापुरात सुरु आहे.

मदत नाही तर विरोधही नको – महाडिक

“काँग्रेस आमदार सतेज पाटील स्वतःला राहुल गांधीपेक्षा मोठे समजतात. मला मदत नाही केली तरी ठीक आहे, पण त्यांनी विरोध करायला नको होता”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी म्हटलं. धनंजय महाडिक यांनी 1 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक तर शिवसेनेकडून संजय मंडलिक यांच्यात लढत होत आहे. मात्र काँग्रेसचे सतेज पाटील यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी धनंजय महाडिक प्रयत्नशील आहे. पण विधानसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांचे चुलतबंधू अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पराभव केल्याने, ते खवळले आहेत.

सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांचं वैर काय? मुन्ना-बंटी वाद

डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र सतेज पाटील यांचे राजकारणातील कट्टर शत्रू मानले जाणारे धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार आहेत. हे दोघेही एकमेकांचे हाडवैरी आहेत. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पाठिंबा मागितला होता. त्यानंतर सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्यासोबतचं वैर विसरुन, त्यांना निवडून आणण्याची शपथ घेतली होती. इतकंच नाही तर मोदी लाटेत धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार निवडूनही आले होते. सतेज पाटलांच्या पाठिंब्यामुळे धनंजय महाडिक निवडून आले.

मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली. त्यामुळे सतेज पाटील यांच्याविरोधात भाजपकडून धनंजय महाडिकांचा चुलत भाऊ आणि महादेवराव महाडिकांचे सुपुत्र अमल महाडिक उभे राहिले. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात काँटे की लढाई झाली. या निवडणुकीत सतेज पाटील यांना हरवण्यासाठी धनंजय महाडिक यांनी प्रचंड जोर लावला. त्याचा परिणाम म्हणून तत्कालिन गृहराज्यमंत्री असलेले सतेज पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे बंटी-मुन्ना पुन्हा एकदा कट्टर शत्रू बनले. लोकसभा निवडणुकीत मदत करुनही धनंजय महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीत धोकेबाजी केल्याचा आरोप सतेज पाटील यांचा आहे.

याशिवाय काँग्रेसचे विधानपरिषदेचे तत्कालीन आमदार असलेले महादेवराव महाडिक यांनीही काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार न करता, निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या मुलाचा प्रचार करुन, सतेज पाटील यांचा पराभव केला.

या सर्वांचा वचपा सतेज पाटील यांनी 2015 मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काढला. सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचा पराभव केला. तेव्हापासून महाडिक विरुद्ध बंटी असा सामना कोल्हापुरात सातत्याने रंगला आहे. मग ती जिल्हा परिषद निवडणूक असो, महापालिका निवडणूक असो, गोकुळ दूधसंघ निवडणूक असो वा साखर कारखान्याची निवडणूक असो, सर्व ठिकाणी मुन्ना विरुद्ध बंटी असा सामना पाहायला मिळतो.

दरम्यान, अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुकीचं मतदान येऊन ठेपलं असताना, बंटी-मुन्ना वाद सुटता सुटत नाही. त्यामुळे आघाडीत कोल्हापूरवरुन मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या 

मुन्ना-बंटीमध्ये समेट घडवणं शरद पवारांनाही अशक्य!  

मदत नाही तर नाही, विरोध तर करु नका, धनंजय महाडिक हतबल  

ज्यांच्या मनधरणीसाठी जयंत पाटील कोल्हापुरात, ते सतेज पाटीलच जिल्ह्याबाहेर!  

बंटी-मुन्ना वाद मिटवण्यात वेळ घालवणार नाही: हसन मुश्रीफ  

VIDEO : एक बार मैने डिसिजन लिया, तो मैं किसीं की नहीं सुनता : सतेज पाटील  

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.