राजनाथ सिंहांविरोधात शत्रुघ्न सिंन्हांच्या पत्नी पूनम सिंन्हांना उमेदवारी

राजनाथ सिंहांविरोधात शत्रुघ्न सिंन्हांच्या पत्नी पूनम सिंन्हांना उमेदवारी


लखनौ : ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यंदा लखनौमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. भाजपचे उमेदवार राजनाथ सिंह यांच्याविरोधात पूनम सिन्हा निवडणूक लढवणार आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्या डिंपल यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पूनम सिन्हा यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. येत्या 18 एप्रिल रोजी लखनौ मतदारसंघातून त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यामुळे लखनौमध्ये पूनम सिन्हा विरुद्ध राजनाथ सिंह अशी हाय प्रोफाइल लढत पाहायला मिळणार आहे.

लखनौ मतदारसंघातून जितीन प्रसाद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, काँग्रेसतर्फे त्यांना धैरहरा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं. तसेच काँग्रेसने सपा-बसपा आघाडीसाठी सात जागा सोडल्या असून लखनौ हा मतदारसंघ त्यापैकी एक आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पूनम सिन्हा यांची समाजवादी पार्टीत प्रवेशाची तयारी केली जात होती. त्यानुसार आज मंगळवारी पूनम सिन्हा यांनी पक्षप्रवेश केला आहे. पक्षप्रवेश केल्यानंतर लगेचच सपातर्फे त्यांना लखनौ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे लखनौमध्ये भाजप उमेदवार पूनम सिन्हा यांना भाजप उमेदवार राजनाथ सिंह यांचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान नुकतंच ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काँग्रेसने पाटणा साहिब या मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे.

लखनौ मतदारसंघात 3.5 लाख मुस्लीम मतदार आहेत. याशिवाय, चार लाख कायस्थ मतदार आणि 1.3 लाख सिंधी मतदार आहेत. पूनम सिन्हा सिंधी कुटुंबातील आहेत, तर शत्रुघ्न सिन्हा हे कायस्थ आहेत. विशेष म्हणजे सपाकडे मोठ्या प्रमाणात मुस्लीम मतदार आहेत. पूनम सिन्हा यांना काँग्रेस, सपा आणि बसपाने जाहीर पाठिंबा आहे. त्यामुळे राजनाथ सिंह यांना पराभूत करणं सोपं होईल, अशी चर्चा सध्या लखनौमध्ये रंगली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात म्हणजेच 5 मे रोजी लखनौमध्ये मतदान पार पडणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 18 एप्रिल ही शेवटची तारीख आहे.

पाहा व्हिडीओ:

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI