Eknath Shinde : नवे सरकार सत्तेत येताच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका, आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतील अनेक अधिकाऱ्यांची बदली!

सरकार बदललं की प्रशासमध्ये देखील मोठे फेरबदल होत असतात याचा प्रत्यय पुन्हा एकदा येत आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच नव्या सरकारने आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे.

Eknath Shinde : नवे सरकार सत्तेत येताच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका, आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतील अनेक अधिकाऱ्यांची बदली!
अजय देशपांडे

|

Aug 18, 2022 | 8:44 AM

मुंबई :  सरकार बदललं की प्रशासमध्ये देखील मोठे फेरबदल होत असतात याचा प्रत्यय पुन्हा एकदा येत आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच नव्या सरकारने आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. अवघ्या दोन महिन्यातच पालिका अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या झाल्याने महापालिका प्रशासनात गोंधळाचे वातावरण आहे. सतत बदल्या आणि कार्यपद्धतीत होत असलेल्या बदलामुळे मुंबईकरांच्या प्रश्नाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेला (Shiv Sena) धक्क्यावर धक्के देत आहेत. आता महापालिका प्रशासनातील आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून शिंदे सरकारने शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. धारावी मॉडेल जगप्रसिद्ध करणाऱ्या सहाय्यक आयुक्त किरण दिघावकरांची दोन महिन्यांपूर्वीच जी नॉर्थ वॉर्डमधून भायखळ्याच्या ई वॉर्डमध्ये बदली झाली होती. आता पुन्हा दिघावकरांची बदली पी उत्तर विभाग मालाडमध्ये करण्यात आली आहे. तर, दोन महिन्यापूर्वीच बदली झालेल्या उपायुक्त चंदा जाधव  यांचीही बदली झोन 1 मधून घनकचरा व्यवस्थापन विभागात करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे गोंधळ

अवघ्या दोन महिन्यांमध्येच पुन्हा बदल्या झाल्यामुळे अधिकाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. शिंदे सरकारने शिवसेनेला धक्का देत आदित्य ठाकरे यांच्या मर्जीमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे बोलले जात आहे. सहाय्यक आयुक्त किरण दिघावकरांची दोन महिन्यांपूर्वीच जी नॉर्थ वॉर्ड मधून भायखळ्याच्या ई वॉर्डमध्ये बदली झाली होती. आता पुन्हा दिघावकरांची बदली पी उत्तर विभाग मालाडमध्ये करण्यात आली आहे. तर उपायुक्त चंदा जाधव यांची बदली झोन 1 मधून घनकचरा व्यवस्थापन विभागात करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे महापालिका प्रशासनाचा गोंधळ उडाल्याचे पहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडीच्या अनेक निर्णयांना स्थगिती

दरम्यान दुसरीकडे शिंदे, फडणवीस सरकार सत्तते येताच महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात जे निर्णय घेतले होते त्यातील अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे.  महाविकास आघाडी सरकारने घाईगडबडीत निर्णय घेतले. त्या निर्णयांची अंमलबजावणी करताना काही कायदेशील समस्या निर्माण होऊ नये, म्हणून निर्णयांना स्थगिती देण्यात आल्याचे स्पष्टीकरण शिंदे गटाकडून देण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें