मुंबई : जुन्या पेन्शनच्या आंदोलनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केलेलं विधान वादात आलंय. 95 टक्के कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे, असं ते म्हणाले. त्यावरुन आता आमदारांचा पगार, त्यांचं पेन्शन, त्यांच्याकडची कामं विरुद्ध नोकरदारांचा पगार, त्यांचं पेन्शन आणि त्यांच्या जबाबदारीची तुलना होऊ लागलीय. त्या तुलनेत आता लोकप्रतिनिधी विरुद्ध कर्मचारी यांचा पगार आणि कामांचीही तुलना सुरु झालीय. आमदार संजय गायकवाडांचं म्हणणं आहे की आमदार व्हायला मोठा संघर्ष आणि कित्येक वर्ष गमावली आहेत. नोकरदारांच्या मते त्यांनीही एक नोकरी मिळवण्यासाठी अनेक वर्ष पणाला लावलीयत.