AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jyoti Waghmare : सुप्रियाताई तुमचं कर्तृत्व काय? आपला पक्ष सांभाळता… ज्योती वाघमारे कडाडल्या

Jyoti Waghmare on Supriya Sule : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरून शरद पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जोरदार बाजू मांडली. त्यांच्या या विधानाचे पडसाद राजकारणात उमटणार नाहीत, असं कसं होईल? त्यांच्या या युक्तिवादानंतर खासदार ज्योती वाघमारे यांनी शिंदे सेनेचा किल्ला असा लढवला. त्यांनी सुळे यांच्यावर जोरदार पलटवार केला.

Jyoti Waghmare : सुप्रियाताई तुमचं कर्तृत्व काय? आपला पक्ष सांभाळता... ज्योती वाघमारे कडाडल्या
सुप्रिया सुळे, ज्योती वाघमारे Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 14, 2026 | 8:46 PM
Share

शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जे वक्तव्य केले, त्याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले. शिवसेना ही ठाकरेंची आहे. शिवसेना त्यांचीच होती. आजही आहे आणि उद्याही राहील, असे मोठे वक्तवय् सुप्रिया सुळे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया उसळल्या नाही तर नवलच? खासदार ज्योती वाघमारे यांनी एकहाती शिंदे सेनेचा किल्ला लढवला. त्यांनी सुळे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. आपला पक्ष सांभाळता येत नाही आणि लोकांना तुम्ही शहाणपणा शिकवता? असा पलटवार वाघमारे यांनी केला.

तुमचं स्वतःच काय कर्तृत्व आहे?

सुप्रिया ताई या सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्या आहेत. खासदारकी, आमदारकी आणि पदं तुम्हाला आयती मिळाली आहेत. तुमचं स्वतःच काय कर्तृत्व आहे? असा सवाल वाघमारेंनी केला. लोकांना जनमताआधारे शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडे दिली. ती त्यांच्याकडे सुरक्षित आहे. सुप्रिया ताई तुम्ही लाडकी लेक योजनेच्या लाभार्थी आहात. तुमच्या सारख्या घराणेशाहीतून आलेली लोक, घराणेशाहीचेच समर्थन करतील, अशी सडकून टीका वाघमारे यांनी केली. शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे संबंध महाराष्ट्राने मान्य केल्याचा दावाही वाघमारे यांनी केला.

शिंदेंनी स्वतःचं कर्तृत्व आणि नेतृत्व उभं केलं

सुप्रियाताई तुम्ही शरद पवार यासारख्या मोठ्या नेत्याच्या कन्या आहात. तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलात. खासदारकी आणि आमदारकी तुम्हाला आयती मिळाली. मग तुमचं स्वतःचं कर्तृत्व काय आहे, असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी स्वतःचं कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध केलं आहे. उभं केलं आहे, असे शा‍ब्दिक बाण वाघमारे यांनी सोडले.

शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनतेच्या न्यायालयाने सुद्धा दिला आहे. तुमच्यासारखी घराणेशाहीतून आलेली माणसं ही घराणेशाहीचेच समर्थन करतात. पण याद राखा हा देश घराणेशाहीवर चालत नाही. हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो. लोकशाहीवर चालतो. शिवसेना ही शिंदे यांची आहे हे महाराष्ट्राने मान्य केलं आहे. सुप्रियाताई तुमच्या घरात काय जळतंय, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा असा सणसणीत टोलाही वाघमारे यांनी लगावला.

शिवसेना शिंदेंच्या नेतृत्वात सुरक्षित

शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. विधासभा सभापतींनी दिला आहे. जनतेच्या न्यायालयातही शिंदे यांच्या बाजूने निकाल लागला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित असल्याचा दावा खासदार ज्योती वाघमारे यांनी केला.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश