AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे राम, फडणवीस लक्ष्मण, राज्यात शिंदे सेनाच मोठा भाऊ; महायुतीच्या बड्या नेत्यानं फोडलं नव्या वादाला तोंड

धाराशिवमधील उमरगा येथील एका कार्यक्रमानंतर महायुतीच्या बड्या नेत्यानं वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी शिंदे राम, फडणवीस लक्ष्मण, उद्धव ठाकरे रावण आणि संजय राऊत कैकयी असल्याचे म्हटले आहे.

शिंदे राम, फडणवीस लक्ष्मण, राज्यात शिंदे सेनाच मोठा भाऊ; महायुतीच्या बड्या नेत्यानं फोडलं नव्या वादाला तोंड
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 28, 2026 | 2:10 PM
Share

महायुतीतील मित्रपक्षांमधील सुप्त वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांना रामाची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्मणाची उपमा देत शिवसेनाच राज्यात मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट सुतोवाच केले आहे. त्यांच्या या विधानाने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

धाराशिवमधील उमरगा येथील एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार ज्योती वाघमारे यांनी हे वादग्रस्त विधान केले. त्यांनी सांगितले की, “एकनाथ शिंदे हे राम आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे लक्ष्मण आहेत. राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ आहे.”

सहा खासदारांच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य

सध्या सहा खासदार शिवसेना पक्षात आल्यानंतर महायुतीत ‘राज्यात मोठा पक्ष कोणता’ यावर चर्चा रंगली होती. याच अनुषंगाने ज्योती वाघमारे यांनी शिवसेना हा मोठा पक्ष असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या या विधानामुळे सेना-भाजपातील मोठ्या पक्षावरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा तीव्र झाला आहे.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दिली रावण-कैकयी उपमा

ज्योती वाघमारे यांनी केवळ सत्ताधारी नेत्यांचीच उपमा दिली नाही तर विरोधकांनाही टोमणे मारले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना रावण आणि संजय राऊत यांना कैकयीची उपमा दिली. महायुतीत खळबळ माजली आहे.

नेमकं काय म्हणाल्या?

शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदे यांना रामाची उपमा दिली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्मणाची उपमा देत राज्यामध्ये शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचं खासदार ज्योती वाघमारे यांनी सुतोवाच केला आहे. सहा खासदार शिव सेनेत आल्यानंतर राज्यात मोठा पक्ष कोणता अशी चर्चा सुरू झाली. या अनुषंगाने खासदार ज्योती वाघमारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्मणाची उपमा देत शिवसेना मोठा पक्ष असल्याचं सुचवलं आहे. सेना भाजपामध्ये मोठ्या पक्षावरून सुरू असलेला सुप्त वाद ज्योती वाघमारे यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता भाजपा या वक्तव्याला काय प्रत्युत्तर देत हे पहावं लागेल.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?