भिवंडी : काल्हेर ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार शिवसेना शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी रिव्हॉल्वरने तीन गोळ्या झाडून गोळीबार केला. या हल्ल्यातून दीपक म्हात्रे थोडक्यात बचावले आहेत. याप्रकरणी नारपोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमधील राड्यांना सुरुवात झाली असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.