महाविकास आघाडीची यादी कधी, वंचितसाठी काय आहे प्रस्ताव? संजय राऊत यांनी सर्वच सांगितले

बाळासाहेब आंबेडकर हे परखडपणे बोलतात. त्यांच्यामध्ये समाज हित असतं. हिच त्यांची ताकद आहे. आम्ही वारंवार संवाद साधून आहोत. बाळासाहेब आंबेडकरांचे विचारधारा आम्हाला माहीत आहे. त्यांचा संघर्ष आम्हाला माहीत आहे. त्यांचे संघटनात्मक कौशल्य आम्हाला माहीत आहे.

महाविकास आघाडीची यादी कधी, वंचितसाठी काय आहे प्रस्ताव? संजय राऊत यांनी सर्वच सांगितले
Follow us
| Updated on: Mar 26, 2024 | 12:03 PM

महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरु आहे. काँग्रेसकडून महाराष्ट्रातील बरेचसे उमेदवार जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत प्रचाराची रणनीती ठरवण्यात आल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. शिवसेनेची पहिली यादी तयार झाली आहे. आज दिवसभरात ती आम्ही प्रसिद्धीला देऊ. तसेच महाविकास आघाडीकडून बाळासाहेब आंबेडकरांना चार जागांचा दिलेला प्रस्ताव अजूनही कायम आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

पूर्वी जागा वाटपासाठी मातोश्रीवर बैठका होत होत्या. आता त्यांना दिल्लीत जावं लागतं आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्लीत जावं लागलं. पण छत्रपती शाहू महाराज यांना तिकीट देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने स्वतः घेतला. आम्हाला दिल्लीत जाण्याची गरज लागली नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

बाळासाहेब आंबेडकर हे परखडपणे बोलतात. त्यांच्यामध्ये समाज हित असतं. हिच त्यांची ताकद आहे. आम्ही वारंवार संवाद साधून आहोत. बाळासाहेब आंबेडकरांचे विचारधारा आम्हाला माहीत आहे. त्यांचा संघर्ष आम्हाला माहीत आहे. त्यांचे संघटनात्मक कौशल्य आम्हाला माहीत आहे.

मोघल काळात मंडलिक संस्थानांचे वर्चस्व होतं. ते सध्या महाराष्ट्रमध्ये आहे. स्वतः निर्णय घेण्याची कुवत आणि हिम्मत अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांमध्ये नाही. रामलीला मैदानावर महारॅली आहे. देशभरातून हुकुमशाही विरोधात लोक एकवटणार आहे. देशावरती हुकूमशाहीचा राज्य सुरू आहे. त्या विरोधात आम्ही सर्व एकवटणार आहोत. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे शरद पवार हे त्या मेळाव्याला उपस्थित राहतील. या देशात लोकशाही आहे. मुंबईत आम्ही शिवाजी पार्कच्या जागेसाठी परवानगी मागितली आहे.

उदयनराजे आमच्यासाठी प्रिय आहेत. आमच्यासाठी आदर्श आहेत. छत्रपती शाहू महाराजांना जेव्हा तिकीट द्यायचे होते त्यावेळी आम्ही एकमेकांना विचारून निर्णय घेतला. आम्हाला दिल्लीत जाऊन कोणाच्या नावावर बसायची गरज लागली नाही. कंगना राणावत या अभिनेत्री आहेत पद्मश्री आहेत. भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्याला आम्ही काय आक्षेप घेणार? तिच्यासोबत व्यक्तिगत संघर्ष असल्याचा कारणच नाही. मुंबई महानगरपालिकेने त्यांच्यावर कार्यवाही केली होती. कारण बेकायदेशीर काम झाले होते.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.