‘बिग बॉस’ विजेत्या शिव ठाकरेचा मनसेसाठी प्रचार

रविवारच्या दिवसाचा मुहूर्त साधत संदीप देशपांडेंनी प्रचाराचा धुरळा उडवला. माहिम आणि दादर परिसरात मनसेने केलेल्या प्रचाराला बिग बॉस फेम शिव ठाकरे याने उपस्थिती लावली होती.

'बिग बॉस' विजेत्या शिव ठाकरेचा मनसेसाठी प्रचार
अनिश बेंद्रे

|

Oct 06, 2019 | 3:34 PM

मुंबई : बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे मनसेच्या प्रचारासाठी मैदानात उतरला (Shiv Thackeray in MNS Campaign) आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचारासाठी शिव ठाकरे माहिममध्ये आला होता.

संदीप देशपांडे हे शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रविवारच्या दिवसाचा मुहूर्त साधत संदीप देशपांडेंनी प्रचाराचा धुरळा उडवला. माहिम आणि दादर परिसरात मनसेने जोरदार प्रचार केला.

एकीकडे ‘बिग बॉस’मध्ये वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चांना तोंड फोडणारा अभिजीत बिचुकले वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना चॅलेंज करत आहे. तर दुसरीकडे ‘बिग बॉस’च्या त्याच पर्वातला ठाकरे आडनावाचा शिव आडनावबंधू अर्थात ‘राज ठाकरे’ यांना पाठिंबा (Shiv Thackeray in MNS Campaign) देत आहे.

कोण आहे शिव ठाकरे?

शिव ठाकरे हा मूळ अमरावतीचा. ‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये सुरुवातीपासूनच शिव ठाकरे याला प्रेक्षकांनी फेवरिट मानलं होतं. ‘रोडीज्’ या रिअॅलिटी शोमधून आलेल्या शिवची सुरुवात काहीशी दबकत झाली. मात्र नंतर त्याने पकडलेला जोर कायम राहिला. अभिनेत्री वीणा जगतापसोबत ‘बिग बॉस’च्या घरात त्याचं सूत जुळलं. दोघं लवकरच विवाहगाठ बांधणार असल्याचं सांगतात.

विशेष म्हणजे अभिजीत बिचुकलेशी शिव ठाकरेची गट्टी होती. परंतु बिचुकलेला पाठिंबा न देता शिव मनसे उमेदवाराच्या पाठीशी उभं राहिल्याचं दिसत आहे.

पुण्यात ‘राज’गर्जना घुमण्यात अडचण, राज ठाकरेंना सभेसाठी मैदान मिळेना

शिव ठाकरेसोबतच अभिनेत्री स्मिता तांबे आणि नृत्यांगना फुलवा खामकर यांच्यासह मराठी कलाकार मनसेच्या प्रचारासाठी आले होते. मराठी कलाकारांनी सुरुवातीपासूनच मनसेची पाठराखण केल्याचं पाहायला मिळत होतं. यंदाच्या निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होताना दिसते.

खळ्ळ-खटॅक फेम संदीप देशपांडे

संदीप देशपांडे हे मनसेच्या तिकीटावर मुंबई महापालिकेत नगरसेवकपदी निवडून आले होते. संदीप देशपांडे यांनी ईव्हीएमच्या मुद्दयावरुन सरकारवर अनेक वेळा तोफ डागली आहे. पत्रकार परिषदेला घाबरणारे पंतप्रधान ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ या साहसी खेळात कसे सहभागी होतात? असा सवाल करत संदीप देशपांडे यांनी थेट पंतप्रधानांना सवाल केला होता.

मुंबई मेट्रोच्या भूमिपूजनाच्या शिळेवर मराठी भाषेला बगल दिल्याबद्दलही संदीप देशपांडेंनी सरकारवर टीका केली होती.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें