युती ते आघाडी, प्रमुख 62 बंडखोरांची यादी

युती आणि आघाडीच्या उमेदवारांविरोधात (Shivsena BJP rebels List) उभे ठाकलेले बंडखोर त्यांचा अर्ज मागे घेतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यातील 62 बंडखोरांचा हा आढावा..

युती ते आघाडी, प्रमुख 62 बंडखोरांची यादी

मुंबई : राज्यात शिवसेना आणि भाजप युतीला बंडखोरीचं (Shivsena BJP rebels List) ग्रहण लागलंय. येत्या दोन दिवसात या बंडखोरांचं मन वळवण्यात यश न आल्यास दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीने युतीच्या बंडखोरांनाच अनेक ठिकाणी तिकीट देऊन नवी चाल खेळली आहे. त्यामुळे युती आणि आघाडीच्या उमेदवारांविरोधात (Shivsena BJP rebels List) उभे ठाकलेले बंडखोर त्यांचा अर्ज मागे घेतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यातील 62 बंडखोरांचा हा आढावा..

भाजप उमेदवारांविरोधात बंडखोरी (26)

 1. यवतमाळ – भाजपचे विद्यमान आमदार पालकमंत्री मदन येरावारांविरोधात शिवसेनेच्या संतोष ढवळेंची बंडखोरी
 2. रामटेक – भाजपच्या मल्लिकार्जुन रेड्डींविरोधात शिवसेनेच्या आशिष जैस्वालांची बंडखोरी
 3. वाशिम – भाजप उमेदवार लखन मलिकांविरोधात शिवसेनेच्या निलेश पेंढारकर यांची बंडखोरी
 4. जत – भाजप उमेदवार आमदार विलासराव जगतापांविरोधात डॉ. रवींद्र आरळींची सर्वपक्षीय आघाडीतर्फे बंडखोरी
 5. मिरज – भाजप उमेदवार सुरेश खाडेंविरोधात भाजपच्या माजी नगरसेविका शुभांगी आनंदा देवमानेंची बंडखोरी
 6. शिराळा – भाजप उमेदवार आमदार शिवाजीराव नाईकांविरोधात भाजपच्या सम्राट महाडिकांची बंडखोरी
 7. सांगली – भाजप उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांच्याविरोधात भाजपाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांची बंडखोरी
 8. वाई – भाजप उमेदवार मदन भोसलेंविरोधात शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधवांची बंडखोरी
 9. अहमदपूर – भाजपच्या विनायक जाधव पाटील यांच्या विरोधात भाजपच्या दिलीप देशमुखांची बंडखोरी
 10. आष्टी-पाटोदा-शिरुर – भाजपच्या भीमराव धोंडेंविरोधात भाजपच्या जयदत्त धस यांची बंडखोरी (अर्ज मागे घेणार असल्याची माहिती)
 11. कणकवली – भाजप उमेदवार नितेश राणेंविरोधात बंडखोर सतिश सावंतांना शिवसेनेचा पाठिंबा
 12. कणकवली – भाजप उमेदवार नितेश राणेंविरोधात भाजपच्या संदेश पारकरांची बंडखोरी
 13. पेण भाजपच्या रवीशेठ पाटील यांच्याविरोधात शिवसेनेच्या नरेश गावंडांची बंडखोरी
 14. कल्याण पूर्व – भाजप उमेदवार आमदार गणपत पाटलांविरोधात शिवसेनेचे नगरसेवक धनंजय बोडारेंची बंडखोरी
 15. नाशिक पश्चिम – भाजपच्या सीमा हिरेंविरोधात शिवसेनेच्या विलास शिंदे, सुधाकर बडगुजर, मामा ठाकरेंची बंडखोरी
 16. नाशिक पूर्व – भाजप उमेदवार राहुल ढिकलेंविरोधात भाजपाचे माजी शहराध्यक्ष आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांची राष्ट्रवादीच्या तिकिटावर बंडखोरी
 17. मुक्ताईनगर – भाजपच्या रोहिणी खडसेंविरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटलांची बंडखोरी
 18. नंदुरबारला – भाजपच्या विजयकुमार गावितांविरोधात भाजप आमदार उदयसिंग पाडवींची बंडखोरी
 19. मावळ – भाजपच्या बाळा भेगडेंविरोधात रवींद्र भेगडेंचं बंड
 20. मावळ – भाजपच्या बाळा भेगडेंविरोधात भाजपच्या सुनिल शेळके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी
 21. खडकवासला – भाजपच्या भिमराव तापकिरांविरोधात शिवसेनेच्या रमेश कोंडेंची बंडखोरी
 22. कसबा – भाजपच्या मुक्ता टिळकांविरोधात शिवसेनेच्या विशाल धनवडेंची बंडखोरी
 23. माण – भाजपचे उमेदवार जयकुमार गोरेंविरोधात सख्खे भाऊ शेखर गोरेंची शिवसेनेतून उमेदवारी
 24. वर्सोवा – भाजप-शिवसंग्राम उमेदवार भारती लव्हेकरांविरोधात राजुल पटेलांची बंडखोरी
 25. मीरा भाईंदर – भाजप उमेदवार नरेंद्र मेहतांविरोधात माजी महापौर आणि भाजप नगरसेविका गीता जैन यांची बंडखोरी
 26. ऐरोली – भाजप उमेदवार गणेश नाईकांविरोधात शिवसेनेच्या विजय नाहटांची बंडखोरी (उमेदवारी मागे घेणार असल्याची माहिती)

  भाजप-शिवसेना घटकपक्षांविरोधात बंडखोरी (01)

पंढरपूर – माजी आमदार सुधाकर परिचारकांना महायुतीत रयत क्रांती संघटनेची उमेदवारी मिळाल्याने भाजपच्या समाधान आवताडे आणि शिवसेनेच्या शैला गोडसेंची बंडखोरी

शिवसेना उमेदवारांविरोधात बंडखोरी (26)

 1. अंधेरी – मतदारसंघात शिवसेना उमेदवार रमेश लटकेंविरोधात भाजपचे नगरसेवक मुरजी पटेलांची बंडखोरी
 2. वांद्रे मतदारसंघात शिवसेना उमेदवार विश्वनाथ महाडेश्वरांविरोधात शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंतांची बंडखोरी
 3. भिवंडी पूर्व – शिवसेना उमेदवार विरोधात भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांची बंडखोरी
 4. कल्याण पश्चिम – शिवसेना उमेदवार विश्वनाथ भोईरांविरोधात भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवारांची बंडखोरी
 5. खेड दापोली – शिवसेनेच्या योगेश कदमांविरोधात भाजपच्या केदार साठेंची बंडखोरी
 6. सावंतवाडी – शिवसेना उमेदवार गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांविरोधात भाजपच्या राजन तेलींची बंडखोरी
 7. गुहागर – शिवसेनेच्या भास्कर जाधवांविरोधात भाजपच्या विनय नातूंची बंडखोरी
 8. गुहागर – शिवसेनेच्या भास्कर जाधवांविरोधात शिवसेनेच्या सहदेव बेटकर यांची राष्ट्रवादीत प्रवेश करत महाआघाडीतर्फे उमेदवारी
 9. गुहागर – शिवसेनेच्या भास्कर जाधवांविरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष रामदास राणेंचं बंड
 10. चिपळूण – शिवसेनेच्या विरोधात भाजपच्या तुषार खेतल यांची बंडखोरी
 11. देवळाली – शिवसेनेच्या योगेश घोलप यांच्याविरोधात भाजप नगरसेविका सरोज अहिरेंची राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी
 12. चोपडा – शिवसेनेच्या उमेदवार लताबाई सोनवणेंविरोधात भाजपच्या मगन सैंदाणे आणि शामकांत सोनवणेंची बंडखोरी
 13. अक्कलकुवा – शिवसेनेच्या आमशा पाडवी यांच्या विरोधात भाजपच्या नागेश पाडवींची बंडखोरी
 14. बुलडाणा – शिवसेना उमेदवार विरोधात माजी आमदार विजयराज शिंदे यांची वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर बंडखोरी
 15. सिल्लोड – शिवसेना उमेदवार अब्दुल सत्तारांविरोधात अपक्ष उमेदवार प्रभाकर पलोदकर यांना भाजप नाराजांचा पाठिंबा
 16. वैजापूर – शिवसेनेच्या रमेश बारणारेंविरोधात भाजपच्या एकनाथ जाधव आणि दिनेश परदेशींची बंडखोरी
 17. पालघर – शिवसेना उमेदवाराविरोधात शिवसेना आमदार अमित घोडा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, ती जागा काँग्रेसला दिली असूनही त्यांनी काँग्रेस उमेदवार योगेश नमविरोधात बंडखोरी केली.
 18. बोईसर – शिवसेनेच्या विलास तरेंविरोधात भाजपच्या संतोष जनाठेंची बंडखोरी
 19. शहापूर – शिवसेनेचे उमेदवार आमदार पांडुरंग बरोरांविरोधात माजी शिवसेना आमदार दौलत दरोडा यांची राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी
 20. उरण – शिवसेनेचे आमदार आणि जिल्हा प्रमुख मनोहर भोईरांविरोधात भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांची बंडखोरी
 21. पिंपरी – शिवसेनेच्या आमदार गौतम चाबुकस्वारांविरोधात भाजपच्या अमित गोरखेंची बंडखोरी
 22. कागल – शिवसेनेच्या संजय घाटगेंविरोधात भाजपच्या समरजीत घाटगेंची बंडखोरी
 23. माढा – शिवसेनेच्या संजय कोकाटेंविरोधात भाजपच्या मिनलताई साठेंची बंडखोरी
 24. करमाळा – शिवसेनेच्या रश्मी बागलांविरोधात शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांची बंडखोरी
 25. इस्लामपूर – शिवसेनेच्या गौरव नायकवाडींविरोधात नगराध्यक्ष भाजप नेते निशीकांत पाटील यांची भाजपविरोधात बंडखोरी
 26. श्रीरामपूर – शिवसेनेच्या भाऊसाहेब कांबळेंविरोधात खासदार सदाशिव लोखंडेंचे चिरंजीव डॉ. चेतन लोखंडेंची बंडखोरी

  काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाआघाडीतील बंडखोरी (08)

 

 1. अलिबाग – काँग्रेसच्या उमेदवार श्रद्धा ठाकुरांविरोधात माजी आमदार मधुशेठ ठाकुरांच्या दोन कुटुंबीयांचे अर्ज
 2. सोलापूर शहर मध्य – काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुबेर बागवान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला
 3. अहमदनगर – शहर राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांविरोधात राष्ट्रवादीच्या किरण काळे यांची वंचितमधून उमेदवारी
 4. सांगोला – महाआघाडीतील शेकापचे उमेदवार अनिकेत गणपतराव देशमुखांविरोधात राष्ट्रवादीच्या दीपक साळुंखेंची बंडखोरी
 5. शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघात महाआघाडीचे समाजवादी पार्टी उमेदवार अबू आझमींविरोधात काँग्रेस नगरसेवक सुफियान वनूंची बंडखोरी
 6. पंढरपूर राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्या विरोधात काँग्रेसचे शिवाजी काळुंगे रिंगणात
 7. हिंगणघाट – राष्ट्रवादीच्या राजू तिमांडेंविरोधात राष्ट्रवादीच्या सुधीर कोठारींचं बंड
 8. शिरोळ – स्वाभिमानीच्या विरोधात राष्ट्रवादीच्या राजेंद्र पाटील-यड्रावकरांची बंडखोरी
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *