AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या लाटेसमोर शिवसेनेची गळचेपी, मराठवाड्यात शिवसेनेचा आलेख घसरला

एकीकडे शिवसेना-भाजप युतीचा अंतिम निर्णय अद्यापही स्पष्ट झालेला नाही (BJP-Shivsena Alliance). तर दुसऱ्या बाजूला शिवसेना आपली स्वबळाची तयारी असल्याची वल्गना करत आहे. पण मराठवड्यातील शिवसेनेची राजकीय परिस्थिती पाहिली तर शिवसेनेच्या आलेखाला उतरती कळा लागल्याचं चित्र आहे

भाजपच्या लाटेसमोर शिवसेनेची गळचेपी, मराठवाड्यात शिवसेनेचा आलेख घसरला
| Updated on: Sep 26, 2019 | 4:15 PM
Share

औरंगाबाद : एकीकडे शिवसेना-भाजप युतीचा अंतिम निर्णय अद्यापही स्पष्ट झालेला नाही (BJP-Shivsena Alliance). तर दुसऱ्या बाजूला शिवसेना आपली स्वबळाची तयारी असल्याची वल्गना करत आहे. पण मराठवड्यातील शिवसेनेची राजकीय परिस्थिती पाहिली तर शिवसेनेच्या आलेखाला उतरती कळा लागल्याचं चित्र आहे (Shivsena loosing controll in Marathwada).

जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक उमेदवार मराठवाड्यातून बिनदिक्कत निवडून यायचे, अगदी त्यावेळीही या दोन्ही पक्षाला टक्कर देण्याचं काम शिवसेनेने केलं. मात्र, भारतीय जनता पार्टीच्या (BJP) वादळापुढे टक्कर देणाऱ्या शिवसेनेचा आवाज मराठवाड्यात क्षीण होऊ लागला का, असा सवाल अलिकडे उपस्थित होत आहे. कारण, युतीच्या जागावाटपात शिवसेनेला आपल्या हक्काच्या अनेक जागांवर पाणी सोडावं लागणार आहे (BJP-Shivsena Alliance). तर, शिवसेनेचे गड समजल्या जाणाऱ्या अनेक जागांवर भाजपने आपला दावा सांगितला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील मध्य विधानसभा मतदार संघ, गंगापूर विधानसभा मतदार संघ, जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदार संघ, लातूर जिल्ह्यातील औसा मतदार संघ, या शिवसेनेचे गड समजल्या जाणाऱ्या मतदार संघावर भाजपने आपला दावा सांगितला आहे. बदनापूर आणि गंगापूर या दोन मतदार संघात तर भाजपने मागच्या निवडणुकीत आपले उमेदवार निवडून आणले आहेत. इतर मतदार संघात आपली ताकत जास्त असल्याचा दावा करुन भाजपने त्यावर दावा सांगितला आहे. सन्मानजनक युती झाली नाही, तर सेनेला या मतदार संघावर पाणी सोडावे लागणार आहे.

तर दुसरीकडे, मराठवाड्यात गेल्या पाच वर्षात भाजपचा एकही आमदार फुटला नाही. मात्र, शिवसेनेचे दोन आमदार हे पक्ष सोडून गेले आहेत. त्यात महत्वाचं नाव म्हणजे प्रतापराव पाटील चिखलीकर, चिखलीकर यांनी शिवसेनेचा हात सोडून भाजपचा हात हाती घेतला होता आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजयही मिळवला. तर, कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही शिवसेनेला सोडचिठ्ठी देत स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यामुळे शिवसेना आमदारांची संख्या आधीच कमी झाली आहे.

दुसऱ्या बाजूला शिवसेनेसमोर बंडखोरीचं एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. शिवसेनेने काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांना पक्षात घेतलं, त्यांच्यासमोर भाजप बंडखोरी करण्याची शक्यता आहे. बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्यासमोर भाजपचा मित्रपक्ष शिवसंग्राम बंडखोरी करू शकतो. तर, औरंगाबाद पश्चिम मतदार संघात भाजपच्या एका नगरसेवकाने दंड थोपटायला सुरुवात केली आहे. जालन्यात अर्जुन खोतकर यांना बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. पण, जर कुणी बंडखोरी केली तर त्याला सोडणार नाही असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांची आकडेवारी पाहता यात शिवसेनेला फारशी पोषक स्थिती पाहायला मिळत नाही. औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या कन्नड, मध्य, गंगापूर आणि वैजापूर या चार मतदार संघात एमआयएम आणि अपक्षाला चांगली आघाडी मिळाली आहे. तर शिवसेनेचे चार वेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे यांचा निसटता पराभव झाला आहे. दुसऱ्या बाजूला परभणी हिंगोली आणि उस्मानाबादला शिवसेनेचे खासदार निवडून आले असले, तरी त्यांना मिळालेली लीड म्हणावी इतकी समाधानकारक नाही. त्यामुळे मराठवाड्यात शिवसेनेचा आलेख घसरत असल्याचं चित्र आहे.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांसमोर शशिकांत शिंदे म्हणाले, आमची निष्ठा शरद पवारांवर, उद्धव ठाकरेंकडून शब्द, सूडाने वागणार नाही!

लोकसभेवेळीच आमचा विधानसभेचा फॉर्म्युला ठरलाय : उद्धव ठाकरे

युतीच्या घोषणेपूर्वीच शिवसेनेच्या दिलीप सोपलांनी प्रचाराचा नारळ फोडला

घटस्थापनेदिवशी युतीची घोषणा, फॉर्म्युला मात्र गुलदस्त्यात!

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...