सबुरीने देत नसाल तर ते खेचून आणू : तानाजी सावंत

शिवसेनेचे नाराज आमदार तानाजी सावंत पुन्हा सक्रिय झाले आहेत. सावंत यांनी आज (4 फेब्रुवारी) तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आपल्या कामाला सुरुवात केली.

सबुरीने देत नसाल तर ते खेचून आणू : तानाजी सावंत

उस्मानाबाद : शिवसेनेचे नाराज आमदार तानाजी सावंत पुन्हा सक्रिय झाले आहेत. सावंत यांनी आज (4 फेब्रुवारी) तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आपल्या कामाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी उस्मानाबादच्या पाणी प्रश्नावर सबुरीनं देत नसाल, तर खेचून आणू, अशी भूमिका जाहीर केली (Tanaji Sawant on Osmanabad water issue). तसेच पाण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ, असा इशाराही दिला.

तानाजी सावंत म्हणाले, “उस्मानाबादच्या हक्काच्या 21 टीएमसी पाण्याबाबत कोणीही अन्याय करू शकणार नाही. सबुरीने देत नसाल तर ते खेचून आणू. पाण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ. वॉटर ग्रीड, नदीजोड प्रश्नी मराठवाड्याचे सर्व आमदार एकत्र येऊन मराठवाड्यावर अन्याय होईल असा निर्णय सरकारला घेऊ देणार नाही.”

मी नाराज नाही. मात्र, उस्मानाबादला मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अपेक्षाभंग झाला आहे. माझ्या नाराजीच्या बातम्या फक्त माध्यमांनीच दाखवल्या. मी माझी भूमिका पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितली आहे. त्यामुळे त्यांना याविषयीची माहिती आहे, असंही तानाजी सावंत यांनी नमूद केलं.

तानाजी सावंत यांच्या नाराजीची चर्चा का?

दरम्यान, तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा मोठ्या काळापासून सुरु आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करत तानाजी सावंतांनी भाजपला साथ (Tanaji Sawant with BJP) दिली होती. भाजप-शिवसेनेच्या युतीमुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची निवड झाली होती.

यानंतर शिवसैनिकांकडून सावंत यांच्याविरोधात पोस्टरबाजीही करण्यात आली. त्यामुळे चांगलाच तणाव वाढला. मात्र, अखेर तानाजी सावंत यांनी मंत्रिपद नाकारल्यावरुन सुरु असलेल्या नाराजीनाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. सावंतांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली.

Tanaji Sawant on osmanabad water issue

संबंधित बातम्या :

‘तीर’ ऐसा लगा… शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांची भाजपशी युती

हा खेकडा शिवसेना पोखरतोय, उद्धवसाहेब वेळीच नांग्या मोडा, तानाजी सावंतांविरोधात शिवसैनिकांची पोस्टरबाजी

शिवसेनेच्या तानाजी सावंत यांना भाजपशी युती भोवणार, पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता

विधानपरिषद निवडणूक : यवतमाळमध्ये तानाजी सावंतांच्या जागी सेनेचा तगडा उमेदवार

भाजपशी हातमिळवणी करणारे शिवसेनेचे ‘नाराज’ नेते तानाजी सावंत ‘मातोश्री’वर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI