AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे vs ठाकरे, बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा

बाळासाहेबांबरोबर काम केलेल्या 11 ज्येष्ठ शिवसैनिकाच्या हस्ते उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला जाणार आहे

ठाकरे vs ठाकरे, बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा
| Updated on: Jan 23, 2020 | 8:33 AM
Share

मुंबई : एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनाकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं असतानाच शिवसेनेनेही वचनपूर्ती सोहळ्याचं आयोजन (Shivsena Vachanpurti Program) केलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या शिवसेना वचनपूर्ती जल्लोष सोहळ्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जाहीर सत्कार होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात हा सोहळा रंगणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळी बाळासाहेबांबरोबर काम केलेल्या 11 ज्येष्ठ शिवसैनिकाच्या हस्ते उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला जाणार आहे. मुंबईतील शिवसैनिकांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी ‘टीव्ही9 मराठी’ला दिली. हा कार्यक्रम सरकारी नसून शिवसेनेचा असल्याचं परब यांनी सांगितलं.

बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मददिवस आमच्यासाठी सण असतो. गेली अनेक वर्ष हा सण उत्साहात साजरा केला जातो. शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाल्यामुळे यंदा या सणाचं महत्त्व वाढलं आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण केलं. त्यामुळे उद्याचा दिवस वचनपूर्ती सोहळा म्हणूनही साजरा करत असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेला शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही. गेल्या 50 वर्षात शिवसेनेची शक्ती सर्वांनी पाहिली आहे, असं म्हणत परबांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

#मनसे_महाअधिवेशन, नवा झेंडा, नवा अजेंडा, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

शिवसेनेच्या वचनपूर्ती जल्लोष कार्यक्रमात ज्येष्ठ गायक शंकर महादेवन, सुखविंदर सिंग, अवधूत गुप्ते, संगीतकारद्वयी अजय-अतुल, गायिका बेला शेंडे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे, विनोदवीर भाऊ कदम, तालसम्राट शिवमणी हे कलाकार उपस्थित (Shivsena Vachanpurti Program) राहणार आहेत.

दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन मुंबईत होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना साद घातली आहे. राज ठाकरे अधिवेशनात कोणती भूमिका मांडणार, पक्षाचा नवा झेंडा आणि अजेंडा काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. गोरेगावातील नेस्को ग्राऊण्डवर सकाळी नऊ वाजल्यापासून महाअधिवेशन रंगणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.