नागपुरात शहर अध्यक्षांच्या पदग्रहण समारंभात शॉर्ट सर्किट, उर्वरित कार्यक्रम अंधारात उरकला

भाजप कार्यालयात नवीन शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांचा आज पदग्रहण समारंभ होता. यादरम्यान  सभागृहातील एमसीबीमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाला. शॉर्ट सर्किट झाल्याने धूर निघू लागल्या, त्यामुळे उपस्थित भाजप कार्यकर्ते आणि पाहुण्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

नागपुरात शहर अध्यक्षांच्या पदग्रहण समारंभात शॉर्ट सर्किट, उर्वरित कार्यक्रम अंधारात उरकला
Follow us
| Updated on: Jun 23, 2019 | 10:06 PM

नागपूर : भाजप कार्यालयात नवीन शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांचा आज पदग्रहण समारंभ होता. यादरम्यान  सभागृहातील एमसीबीमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाला. शॉर्ट सर्किट झाल्याने धूर निघू लागल्या, त्यामुळे उपस्थित भाजप कार्यकर्ते आणि पाहुण्यांची चांगलीच तारांबळ उडाली. हॉलमध्ये आग लागल्याची भीती निर्माण झाली. त्यानंतर लगेच कार्यकर्त्ये हॉलमधून खाली उतरले. विशेष म्हणजे या घटनेमुळे अर्ध्यात राहिलेला पदग्रहण कार्यक्रम बिल्डिंगच्या खालीच अंधारात उरकावा लागला.

नागपूरच्या भाजप कार्यालयात आज नवनियुक्त शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांचा पदग्रहण समारोह आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख आणि  खासदार विकास महात्मे उपस्थित होते. प्रवीण दटकेंच्या पदग्रहण समारोहाला भाजप कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कार्यक्रमात प्रवीण दटकेंच्या भाषणाला सुरुवात झाली. सर्व कार्यकर्तेही शांततेच त्यांचं भाषण ऐकत होते. तेवढ्यात हॉलमधील एमसीबीमध्ये अचानक ठिणगी उडाली. त्यातून धूर निघायला सुरुवात झाली. धूर पाहून कार्यकर्ते घाबरले. त्यानंतर कार्यकर्ते आणि पाहुण्यांची चांगलीच तारांबळ उडाली. हॉलमध्ये गोंधळ होताना पाहून सर्व कार्यकर्ते आणि पाहुण्यांना सभागृहातून खाली उतरवण्यात आले. आग लागल्याने काही वेळासाठी कार्यकर्त्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

सतर्कता बाळगत आग विझवण्याच्या यंत्राच्या साहाय्याने आग विझवण्यात आली. तसेच, अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत कार्यकर्त्यांनी आग विझवलेली होती. एमसीबीमध्येच शॉर्ट सर्किट झाल्याने सभागृहातील विजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे सभागृहाच्या खालीच अंधारात उर्वरित पदग्रहण कार्यक्रम पार पाडावा लागला. मात्र, वेळीच शॉर्ट सर्किट झाल्याचं लक्षात आल्याने एक मोठी दुर्घटना होता होता टळली.

संबंधित बातम्या :

पृथ्वीराज चव्हाणांमुळेच काँग्रेसची अधोगती, राधाकृष्ण विखेंची टीका

विदर्भात काँग्रेसला खिंडार, दुष्यंत चतुर्वेदी यांचा शिवसेनेत प्रवेश

परिणय फुकेंच्या स्वागतासाठी आलेल्या कार्य़कर्त्यांकडून नागपूर विमानतळाचं नुकसान

… तर शिवसेना-भाजपच्या नेत्यांवरच कारवाई, अमित शाह-उद्धव ठाकरेंचा निर्णय

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.