पवारांचं वय सर्वांना माहित, पण पवारांसोबत भिजणाऱ्या श्रीनिवास पाटलांचं वय किती?

श्रीनिवास पाटील हे नाव आता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले  (Shriniwas Patil vs Udayanraje Bhosale) यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराला चितपट करुन, श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil info) यांनी विजयी पथाका फडकावली.

पवारांचं वय सर्वांना माहित, पण पवारांसोबत भिजणाऱ्या श्रीनिवास पाटलांचं वय किती?

मुंबई : श्रीनिवास पाटील हे नाव आता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले  (Shriniwas Patil vs Udayanraje Bhosale) यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराला चितपट करुन, श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil info) यांनी विजयी पथाका फडकावली. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले यांना धडा शिकवण्यासाठी शरद पवारांनी खास मोहरा मैदानात उतरवला, त्यांचं नाव होतं (Shriniwas Patil info) श्रीनिवास पाटील. पिळदार मिशा, डोक्यावर गांधी टोपी, अंगात सदरा आणि उतारवयातही बलदंड शरीर असा रांगडा गडी.

2014 मध्ये देशात सर्वाधिक मतांनी निवडून येणाऱ्यांपैकी एक असलेल्या उदयनराजे भोसलेंविरोधात उभं राहण्यासाठी कोणीही धजावत नव्हतं. मात्र शरद पवारांनी शब्द टाकला आणि श्रीनिवास पाटील एका पायावर तयार झाले.

शरद पवार आणि श्रीनिवास पाटील हे एकमेकांचे घनिष्ठ मित्र. श्रीनिवास पाटील यांना शरद पवारांनीच राजकारणात आणलं. 35 वर्ष प्रशासकीय सेवा केल्यानंतर,  दोन वेळा खासदार, संसदेच्या विविध समित्यांवर काम आणि मग थेट राज्यपालपद भूषवलेल्या श्रीनिवास पाटलांना, राजकीय जीवनात शक्य ते सर्व मिळालं. त्यामुळे आयुष्याच्या उतारवयात निवृत्तीचं आयुष्य आरामात जगणं हे एखाद्याचा जीवनपट असू शकतो. मात्र मित्राच्या हाकेला धावून जाणं हे जीवलग मित्राचं कर्तव्य असतं, तेच श्रीनिवास पाटलांनी केलं.

शरद पवार-श्रीनिवास पाटलांचं वय किती?

78 वर्षीय शरद पवारांची साताऱ्यातील सभा केवळ महाराष्ट्रानेच नाही तर देशाने पाहिली. उभ्या पावसात शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना झालेली चूक सातारकरांसमोर मान्य केली. ती चूक सुधारण्याची संधी मागितील. पाऊस कोसळत होता, 78 वर्षीय पवार भिजत होते. त्यावेळी पवारांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांचा मित्र-श्रीनिवास पाटीलही उभे होते. पवारांनी भाषण करुन उभ्या पावसात ‘आग’ लावली. पवारांच्या भाषणानंतर श्रीनिवास पाटलांनी घोषणा दिली, मान छत्रपतीच्या गादीला, तुमचं मत राष्ट्रवादीला.. श्रीनिवास पाटलांची ही घोषणा सातारकरांनी सत्यात उतरवली. 5 महिन्यांपूर्वी उदयनराजेंना दीड लाखांच्या मताधिक्याने विजयी करणाऱ्या सातारकरांनी, पोटनिवडणुकीत जवळपास लाखभर मतांनी पराभूत केलं.

राजकीय प्रचारात शरद पवारांच्या वयाचा उल्लेख वारंवार झाला. ज्या ताकदीने, ज्या जिद्दीने पवार लढले, त्याच ताकदीने, त्याच जिद्दीने श्रीनिवास पाटीलही त्यांच्यासोबत उभे राहिले. श्रीनिवास पाटील यांचंही वय शरद पवारांएवढंच म्हणजेच, 78 वर्ष इतकंच आहे.

शरद पवारांची जन्म तारीख 12 डिसेंबर 1940, तर श्रीनिवास पाटील यांची जन्म तारीख 14 फेब्रुवारी 1941. म्हणजेच श्रीनिवास पाटील हे शरद पवारांपेक्षा केवळ 2 महिन्यांनी लहान आहेत.

साधारणत: 80 च्या घरात पोहोचलेली माणसं थकलेली, आराम करणारी, काठीचा आधार घेऊन चालताना आपण पाहिली आहेत. मात्र शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांच्यासारखे योद्धे पाहिले तर ते 80 च्या घरातील आहेत, हे कोणालाही वाटणार नाही.

कोण आहेत श्रीनिवास पाटील?

श्रीनिवास पाटील दोन वेळा जुन्या कराड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून श्रीनिवास पाटील यांची ओळख आहे. श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीमुळे उदयनराजेंसमोर मोठे आव्हान उभे राहू शकतं.

कोण आहेत श्रीनिवास पाटील?

  • श्रीनिवास पाटील अगोदर आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा) अधिकारी होते.
  • शरद पवारांनी श्रीनिवास पाटील यांना राजकारणात आणलं
  • श्रीनिवास पाटील हे 1999 ते 2004 आणि 2004 ते 2009 या काळात लोकसभा खासदार होते
  • 1 जुलै 2013 ते 26 ऑगस्ट 2018 या काळात सिक्कीमचे राज्यपाल म्हणून काम
  • राज्यपालपदाची कारकीर्द संपल्यानंतर पुन्हा पक्षासाठी काम सुरु
  • सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीकडून लढले
  • उदयनराजेंविरोधात जवळपास लाखभर मतांनी विजय

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI