महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी, सोनिया गांधींचा शरद पवारांना फोन

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नुकतंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केल्याची माहिती विश्वनीय सूत्रांनी दिली (Sonia Gandhi call Sharad pawar) आहे.

महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी, सोनिया गांधींचा शरद पवारांना फोन

मुंबई : विधानसभेच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नुकतंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केल्याची माहिती विश्वनीय सूत्रांनी दिली (Sonia Gandhi call Sharad pawar) आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात पहिल्यांदा चर्चा झाली आहे. दरम्यान सोनिया गांधी यांच्या फोननंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले (Sonia Gandhi call Sharad pawar) आहे.

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 5 दिवस उलटले आहेत. शिवसेना-भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. अपक्ष आमदारांच्या आपल्याकडे वळवण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. त्यातच नुकतंच सोनिया गांधी यांनी शरद पवारांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सोनिया गांधी यांनी शरद पवारांना फोन करुन अभिनंदन केलं आहे. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही दोघांमध्ये चर्चा झाल्याचे म्हटलं आहे. तर दुसरीकडे सध्या शिवसेना -भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन चांगलाच वाद रंगला आहे.

त्याशिवाय शिवसेनेने ऐनवेळी आज (29 ऑक्टोबर) भाजपसोबत होणारी बैठक देखील रद्द केली. भाजप-शिवसेनेत कलगीतुरा सुरु असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे राजकीय महत्त्व वाढलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला (Sonia Gandhi call Sharad pawar) आहे.

शरद पवारांसह राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते दिवाळीचा कार्यक्रम आटपून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे आता राज्यात सत्तास्थापनेची गणितं कशी बदलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार आणि कोण मुख्यमंत्री होणार याविषयी कमालीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

संबंधित बातम्या 

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता : मुख्यमंत्री   

मीच मुख्यमंत्री, आदित्यला काय ते शिवसेना ठरवेल, मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची 10 विधाने 

मुख्यमंत्री म्हणाले 50-50 ठरलंच नाही, संजय राऊत यांनी ‘तो’ व्हिडीओच लावला   

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानानंतर शिवसेना-भाजपची बैठक रद्द 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *