शिवसेनेची जुळवाजुळव यशस्वी, सोनिया गांधी पाठिंब्याला अनुकूल?

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकांमध्ये काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याविषयी महत्त्वाची भूमिका मांडल्याचं समोर येत (congress alliance with shivsena) आहे.

शिवसेनेची जुळवाजुळव यशस्वी, सोनिया गांधी पाठिंब्याला अनुकूल?
Follow us
| Updated on: Nov 02, 2019 | 9:34 PM

नवी दिल्ली : शिवसेना आणि भाजपात मुख्यमंत्रीपदावरुन चांगलंच वातावरण तापलं (congress alliance with shivsena) आहे. त्यातच दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकांमध्ये काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याविषयी महत्त्वाची भूमिका मांडल्याचं समोर येत (congress alliance with shivsena) आहे.

सध्या भाजप-शिवसेनेची सत्तावाटपावरुन (BJP Shivsena Government Formation Dispute) रस्सीखेच सुरूच आहे. शिवसेना मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील 50-50 च्या वाट्यावर अडून बसली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात नवी दिल्लीत बैठक होत आहेत. त्यात काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती होती. या बैठकीत महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन करण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी शिवसेनेसोबत जाण्याच्या प्रस्तावाबाबत सोनिया गांधी यांनी विचारले असता, त्यांनी याबाबत कोणताही विरोध दर्शवला नाही. तसेच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतही त्यांनी कोणतेही वक्तव्य केलं नाही. मागील 2 दिवसांत झालेल्या विविध बैठकांमध्ये मिळून काँग्रेसच्या नेत्यांनी जवळपास अडीच तास महाराष्ट्र सरकार स्थापनेवर चर्चा केल्याचंही बोललं जात (congress alliance with shivsena) आहे.

यापूर्वी शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी पुढाकार घ्यावा, त्यांना आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली. त्यामुळे राज्यात नवी रणनिती ठरणार का? सत्तास्थापनेचे गणित बदलणार का? महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे रजंक वळण लागणार का? असे सर्व प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

महाराष्ट्र काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही सोनिया गांधींची भेट घेतली

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल (1 नोव्हेंबर)दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील सद्य परिस्थिती आणि सत्ता स्थापनेवर चर्चा झाली. त्यानंतर आता शरद पवारही सोनिया गांधी यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती आहे.

जर शरद पवारांनी शिवसेनेसोबत मिळून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तर कदाचित भाजपचं सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगू शकते. यापूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेने मनात आणलं तर आम्ही बहुमत मिळवू शकतो, असा थेट इशारा भाजपला दिला होता. त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारणाला एक रंजक वळण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेना-भाजपमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन फूट

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 10 दिवस उलटले. मात्र, सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. लहान भाऊ-मोठा भाऊ म्हणत ज्या भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे ही निवडणूक लढली, तेच आता मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापना खोळंबली आहे. त्यातच आघाडीही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे.

संबंधित बातम्या

संजय राऊतांना शिवसेनेकडून अधिकृतपणे बोलण्याचा अधिकार नाही : प्रसाद लाड

… तर राज्यात राष्ट्रपती राजवटीची वेळ येईल : सुधीर मुनगंटीवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, शिवसेनेच्या बालेकिल्यात भाजपचे पोस्टर्स!

सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, काँग्रेसचं शिष्टमंडळ सोनिया गांधींच्या भेटीला

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.