आचारसंहिता : मोदी-शाहांबाबत निर्णय घ्या, सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

आचारसंहिता : मोदी-शाहांबाबत निर्णय घ्या, सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस
तामिळनाडूतील भाजप नेत्यांमुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर तोंडघशी पडण्याची वेळ


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली. यावेळी न्यायालयाने निवडणूक आयोगालाही नोटीस बजावली. याचिकेवर पुढील सुनावणी गुरुवारी (2 मे रोजी) होईल. दरम्यान, निवडणूक आयोगाला यावर काही निर्णय घ्यायचा असेल, तर ते घेऊ शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

संबंधित याचिका आसाममधील सिलचर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आणि विद्यमान खासदार सुष्मिता देव यांनी केली. 146 पानांच्या या याचिकेत त्यांनी म्हटले, “मोदी आणि शाह द्वेषपूर्ण विधाने करतात. तसेच आपल्या राजकीय उद्देशांसाठी भाषणांमध्ये सुरक्षा दलांचा उल्लेख करतात हे सार्वजनिकपणे सर्वांना माहिती आहे. खरंतर निवडणूक आयोगाने निवडणुकीत सुरक्षा दलांचा उल्लेख करण्यावर बंदी घातली आहे. तरीही हा गैरउपयोग होत आहे. निवडणूक आयोगाला अशी 40 प्रकरणे लक्षात आणून दिली, तरीही आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही. आचारसंहितेत नमूद नियम पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांसाठी नसून अन्य उमेदवारांवरच लागू होताना दिसत आहेत.”

दुसरीकडे निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी बैठकीचे आयोजन केल्याचे सांगितले जात आहे. आयोग प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी महत्वाच्या विषयांवर बैठक घेतो. त्यामुळे आज या विषयांवरही बैठकीत काही निर्णय होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या: 

वडिलांचं दोन वर्षांपूर्वी निधन होऊनही मतदार यादीत नाव, जितेंद्र आव्हाडांचा संताप 

मोदींनंतर आता उद्धव ठाकरेंकडून सैनिकांच्या नावाने मतांचा जोगवा 

आझम खान यांना 72 तास, तर मनेका गांधींना 48 तास प्रचारबंदी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI