सत्तास्थापनेचा निर्णय जलदगतीने घ्या, शिवसेनेची काँग्रेसकडे आग्रही मागणी

सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत निर्णय जलदगतीने घ्या, अशी आग्रही मागणी शिवसेनेने काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे (Shiv Sena urges Congress) केली आहे.

सत्तास्थापनेचा निर्णय जलदगतीने घ्या, शिवसेनेची काँग्रेसकडे आग्रही मागणी
Follow us
| Updated on: Nov 19, 2019 | 7:08 PM

नवी दिल्ली : सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत निर्णय जलदगतीने घ्या, अशी आग्रही मागणी शिवसेनेने काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे (Shiv Sena urges Congress) केली आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. दिल्लीत बुधवारी  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (Shiv Sena urges Congress) नेत्यांची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय मार्गी लागण्याची शक्यता आहे.

दिल्लीत राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते दाखल झाले आहेत. शिवाय काँग्रेसचे नेतेही दिल्लीच्या मार्गावर आहेत. शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे यांच्यात आज बैठक झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारचे नेतृत्व करावे ही राष्ट्रवादीची आग्रही मागणी आहे. उद्या काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक पार पडल्यानंतर सर्व नेते मुंबईत परतणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत हे सुद्धा उद्या मुंबईत परतण्याची शक्यता आहे.

शरद पवार- सोनिया गांधी यांची बैठक

दरम्यान, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात काल बैठक झाली. शरद पवार (Sharad Pawar meet Sonia Gandhi) हे सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील 10 जनपथ या निवासस्थानी दाखल झाले होते. तिथे दोघांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली. या भेटीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधून चर्चेचा तपशील सांगितला. शरद पवार म्हणाले, “सोनिया गांधी आणि ए के अँटोनी यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली.  महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. राज्यातील स्थिती सोनिया गांधी यांना सांगितली. या परिस्थितीवर लक्ष ठेवू, वरिष्ठ नेत्यांचं मत घेऊन पुढील रुपरेषा ठरवू. एवढीच चर्चा झाली”

संबंधित बातम्या 

शिवसेना पुन्हा कोंडीत, पाठिंब्याबाबत शरद पवार- सोनिया गांधींमध्ये चर्चाच नाही! 

Non Stop LIVE Update
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.