Eknath Shinde : ठाकरेंना पुन्हा धक्का, नवनियुक्त संपर्कप्रमुखही हेमंत पाटलांच्या नेतृत्वामध्ये शिंदे गटात

हेमंत पाटील हे हिंगोली मतदार संघाचे खासदार आहेत. त्यांनी देखील काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला होता. शिवाय आ. संतोष बांगर हे देखील शिंदे गटातच आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर संघटन उभे रहावे या दृष्टीकोनातून आनंद जाधव यांची बीड, नांदेड आणि हिंगोलीच्या संपर्क प्रमुखपदी निवड करण्याात आली होती. शिवाय त्यांना ज्या मुंबईतून निवडीचे पत्र शिवसेनेकडून देण्यात आले होते त्याच मुंबईत येऊन त्यांनी व त्यांच्या बरोबर बारा तालुकाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Eknath Shinde : ठाकरेंना पुन्हा धक्का, नवनियुक्त संपर्कप्रमुखही हेमंत पाटलांच्या नेतृत्वामध्ये शिंदे गटात
खा. हेमंत पाटील
सुनील जाधव

| Edited By: राजेंद्र खराडे

Aug 16, 2022 | 10:11 PM

मुंबई :  (Rebel MLA) बंडखोर आमदारानंतर पक्ष संघटन आणि पक्ष उभारणीचा प्रयत्न खुद्द (Uddhav Thackeray) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे करीत आहेत. आमदारांपासून सुरु झालेले बंडाचे लोण स्थानिक पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचले आहे. असे असतानाही पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती केली जात आहे. त्याच पद्धतीने नांदेड, हिंगोली आणि बीड जिल्ह्याच्या (Head of Communication) संपर्क प्रमुखपदी आनंद जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत शिंदे गटात प्रवेश केला आहे. खा. हेमंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री गेस्ट हाऊस ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थाना पर्यंत शक्तीप्रदर्शन करीत त्यांनी हा प्रवेश केला आहे. त्यामुळे जिथे शिवसेनेचे संघटन उभे केले जात आहे तिथे देखील त्याला छेद देण्याचे काम आता शिंदे गटाकडून होत असल्याचे समोर येत आहे.

मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांचे मुबंईत शक्तीप्रदर्शन

हेमंत पाटील हे हिंगोली मतदार संघाचे खासदार आहेत. त्यांनी देखील काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला होता. शिवाय आ. संतोष बांगर हे देखील शिंदे गटातच आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर संघटन उभे रहावे या दृष्टीकोनातून आनंद जाधव यांची बीड, नांदेड आणि हिंगोलीच्या संपर्क प्रमुखपदी निवड करण्याात आली होती. शिवाय त्यांना ज्या मुंबईतून निवडीचे पत्र शिवसेनेकडून देण्यात आले होते त्याच मुंबईत येऊन त्यांनी व त्यांच्या बरोबर बारा तालुकाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. नांदेड जिल्ह्यातील 400 ते 500 पदाधिकारी घेऊन खा. हेमंत पाटील यांनी सह्याद्री गेस्ट हाऊस ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थाना पर्यंत शक्तीप्रदर्शन करीत हा प्रवेश केला आहे.

म्हणून सेनेचे संपर्क प्रमुख शिंदे गटात

बीड, हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्याच्या शिवसेनेच्या संपर्क प्रमुखपदी आनंद जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्परता दाखवत अतिवृष्टी भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले केवळ आश्वासनच नाहीतर थेट मदतीचे स्वरुपही बदलले आहे. त्यांचे हे कार्य पाहून प्रभावित झालेले जाधव थेट शिंदे गटात सामील झाले आहेत. मुंबई येथे त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

आयोगाचा निर्णय मान्य असेल : हेमंत पाटील

शिवसेना पक्ष कुणाचा याबाबत अद्यापही सुनावणी सुरु आहे. मात्र, शिवसेनेला शोभेल असे काम राज्यात सुरु आहे. शिवसेना आणि चिन्हाबाबत निवडणुक आयोग जो निर्णय देईल तो आपणास मान्य असेल असे खा. हेमंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय विरोधकांनी चहापाण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार न टाकता शिंदे सरकारच्या कामाचे कौतुक करीत त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे असा खोचक टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें