Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur : हॉटेलमधल्या थाळीचे नाव पाहूनच येणार ‘त्या’ आमदारांची आठवण, शिवसैनिकांचा असा हा निषेध..!

पंढरपूर-सांगोला रस्त्यावरील खर्डी जवळील हॉटेल शिवममध्ये थाळ्यांना अशा प्रकारचे नाव दिले आहे. यामध्ये दोन भाग करण्यात आले आहे. 40 गद्दार ही थाली व्हेज असणार तर 50 खोके एकदम ओके ही थाळी नॉनव्हेज असणार आहे. या थाळ्यांचे मंगळारी उद्घाटन करण्यात आले आहे.

Pandharpur : हॉटेलमधल्या थाळीचे नाव पाहूनच येणार 'त्या' आमदारांची आठवण, शिवसैनिकांचा असा हा निषेध..!
हॉटेलमधील थाळीला आता गद्दारांचे नाव
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 10:39 PM

पंढरपूर : शिवसेनेतून (Rebel MLA) बंड केल्यानंतर त्या 40 आमदरांचा उल्लेख हा गद्दार म्हणूनच केला जाऊ लागला होता. (Shivsena Party) शिवसेनेच्या नेत्यांनी हा शिक्का त्यांच्यावर लावला होता. यावरुन टोकाचे मतभेदही झाल्याचे समोर आले आहे. राजकारणात आरोप-प्रत्यारोप हे होतच असले तरी (Pandharpur) पंढरपूर-सांगोला मार्गावर असे एक हॉटेल आहे ज्याच्या समोरही तुम्ही उभे राहिलात तरी त्या 40 आमदरांची तु्म्हाला आठवण येईल. आता हे कसे शक्य आहे, असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण या कट्टर शिवसैनिकाने आपल्या हॉटेलमधील थाळीलाच 40 गद्दार आणि 50 खोके एकदम ओके असे नाव दिले आहे. आतापर्यंत राज्यात बुलेट थाळी, बाहुबली थाळी अशा अनेक नावांनी थाळ्या समोर आल्या आहेत. मात्र, या शिवम हॉटेलमध्ये येताच 40 गद्दार थाळीचे वेगळेपण काय हे देखील सांगण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे हॉटेल चालकाचे म्हणणे आहे.

म्हणून गद्दार थाळी असे नाव..

शिवसेना एक संघटना होती. यामधील प्रत्येक कार्यकर्ता हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कारामुळे घडलेला आहे. असे असताना ज्यांच्या मुळे या 40 आमदारांना पद, प्रतिष्ठा मिळाली त्यांनीच आपल्याच ताटामध्येच छेद केले. त्यामुळे 40 गद्दार ही थाळी सुरु करण्यात आल्याचे संजय घोडके यांनी सांगितले आहे.

व्हेज-नॉनव्हेज थाळी

पंढरपूर-सांगोला रस्त्यावरील खर्डी जवळील हॉटेल शिवममध्ये थाळ्यांना अशा प्रकारचे नाव दिले आहे. यामध्ये दोन भाग करण्यात आले आहे. 40 गद्दार ही थाली व्हेज असणार तर 50 खोके एकदम ओके ही थाळी नॉनव्हेज असणार आहे. या थाळ्यांचे मंगळारी उद्घाटन करण्यात आले आहे. त्या आमदारांचे कृत्य कायम लक्षात रहावे म्हणून अशा प्रकारे नावे देण्यात आली आहेत. या आमदारांची किंमत त्यांना दाखवून देण्यासाठी नाममात्र शुल्कही ठेवण्यात आले आहे.

गद्दारांनी थाळीचा लाभ घ्यावा

हॉटेलमधील थाळींना केवळ असे नावच देण्यात आले नाही तर गद्दारांनी याचा अस्वादही घ्यावा असे आवाहन शिवसैनिकांनी केले आहे. तर पंढरपूर-सांगोला या मार्गावरुन सांगोल्याचे आमदार शहाजीबापू हे सातत्याने मार्गस्थ होत असातात. त्यांनी या थाळीचा आस्वाद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर त्या गद्दार आमदारांची किंमतच कमी झाल्याने थाळीची किंमतही केवळ 100 आणि 50 रुपये अशी ठेवण्यात आली आहे.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.