Hemant Soren: झारखंडमध्ये राजकीय संकट, बॅगा भरूनच आमदार मिटिंगला पोहोचले; आमदारांना ‘या’ राज्यात ठेवणार

Hemant Soren: मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे खाणी वाटप प्रकरणात दोषी आढळले आहेत. तसा अहवाल निवडणूक आयोगाने राज्यपालांना सोपवला आहे. तसेच सोरेन हे आमदार म्हणून राहण्यास योग्य नसल्याची शिफारसही केली आहे. त्यामुळे सोरेन यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Hemant Soren:  झारखंडमध्ये राजकीय संकट, बॅगा भरूनच आमदार मिटिंगला पोहोचले; आमदारांना 'या' राज्यात ठेवणार
झारखंडमध्ये राजकीय संकट, बॅगा भरूनच आमदार मिटिंगला पोहोचले; आमदारांना 'या' राज्यात ठेवणार
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 1:46 PM

मुंबई: खाण वाटप प्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस निवडणूक आयोगाने केली आहे. याबाबतचा निर्णय राज्यपाल घेणार आहेत. त्यामुळे सोरेन यांचं मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता असल्याने झारखंडमध्ये ((Jharkhand) राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोरेन यांनी गेल्या तीन दिवसांपासून आमदारांच्या बैठकांवर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. आज तर सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्च्याच्या आमदारांसह काँग्रेस (congress) आणि इतर मित्र पक्षांच्या आमदारांना बॅगा घेऊनच बोलावलं. हे सर्व आमदार कपडे भरून भरून बॅगा घेऊन आले आहेत. या सर्व आमदारांना छत्तीसगडमध्ये सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे झारखंडमधील आजच्या राजकीय घडामोडींकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे खाणी वाटप प्रकरणात दोषी आढळले आहेत. तसा अहवाल निवडणूक आयोगाने राज्यपालांना सोपवला आहे. तसेच सोरेन हे आमदार म्हणून राहण्यास योग्य नसल्याची शिफारसही केली आहे. त्यामुळे सोरेन यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यपालांनी या अहवालावर अजून सही केलेली नाही. राज्यपाल आज दिवसभरात कधीही सही करण्याची शक्यता असल्याने सोरेन यांचं टेन्शन वाढलं आहे. सोरेन यांच्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे त्यांना निवडणूक लढवण्यास कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही.

हे सुद्धा वाचा

झारखंडमध्ये नेमकं काय चाललंय?

  1. यूपीएच्या आमदारांच्या बैठकीनंतर महाआघाडीच्या सर्वच आमदारांना नेतरहाट येथे घेऊन जाण्यात येणार आहे. यूपीएच्या सर्व आमदारांना सामान घेऊन बैठकीसाठी यायला सांगितलं आहे. आमदारांना प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज राहण्यास सांगितलं गेलं आहे.
  2. आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांनी बैठकीला जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला. भाजपची कोणतीही खेळी यावेळी चालणार नाही, असं गुप्ता यांनी म्हटलं आहे. जेव्हापासून आमचं सरकार आलं. तेव्हापासून सरकार पाडण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत. पण आम्ही सरकारसोबत मजबुतीने उभे आहोत, असंही त्यांनी सांगितलं. दुसरीकडे तीन आमदारांच्या पक्षांतराची विधानसभा अध्यक्षांनी दखल घेतली आहे. याबाबत बोलताना गुप्ता म्हणाले की, या प्रकाराविषयी सीएलपी लीडर आलमगीर आलम यांना विचारलं पाहिजे.
  3. आमदारांना छत्तीसगडला नेणार असल्याच्या वृत्ताबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर, व्यक्तीला आपल्या सुरक्षेची काळजी असते. सरकारही संरक्षण करण्यास सक्षम आहे, असं ते म्हणाले. यूपीएच्या सर्व आमदारांना सामानासह बैठकीला बोलावलं आहे. प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यास आमदारांना सांगण्यात आलं आहे. कदाचित बैठकीनंतर आमदारांना झारखंडच्या बाहेर शिफ्ट केलं जाऊ शकतं. ते बैठकीतच ठरेल, असं काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितलं.
  4. यूपीएच्या आमदारांच्या बैठकीला काँग्रेसच्या आमदार दीपिका पांडे सिंह पोहोचल्या आहेत. त्यांच्या गाडीत बॅग आणि सुटकेस सिदत आहे.
  5. आमदारांच्या या बैठकीनंतर या सर्व आमदारांना राज्याच्या बाहेर घेऊन जाण्याची तयारी आहे. अनेक आमदारांच्या गाड्यांमध्ये सुटकेस आढळून आल्या आहेत. काही महत्त्वाच्या वस्तूही आढळून आल्या आहेत.
Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.