परळीत धनंजय मुंडेंना मोठा धक्का, टीपी मुंडेंचा पंकजांना पाठिंबा

भाजपातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लवकरच टीपी मुंडे यांचाही भाजप प्रवेश होणार आहे. भाजपच्या परळीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका मांडली.

परळीत धनंजय मुंडेंना मोठा धक्का, टीपी मुंडेंचा पंकजांना पाठिंबा

बीड : काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस टीपी मुंडे (TP Munde BJP) यांनी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. टीपी मुंडे (TP Munde BJP) यांचा एक मुलगा प्रदीप मुंडे जिल्हा परिषद सदस्य, दुसरा मुलगा नगरसेवक आणि युवा काँग्रेसची नेता असलेल्या मुलीने भाजपात प्रवेश केला. भाजपातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लवकरच टीपी मुंडे यांचाही भाजप प्रवेश होणार आहे. भाजपच्या परळीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका मांडली.

टीपी मुंडे यांनी भाजपला पाठिंबा देणं हा धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जातो. कारण, परळीच्या निवडणुकीत टीपी मुंडे यांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मतं मिळवलेली आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधातही टीपी मुंडे यांनी निवडणूक लढवली होती. विशेषतः परळी शहरातील दरी भरुन काढण्यासाठी पंकजा मुंडेंना फायदा होणार असल्याचं सांगितलं जातंय.

कोण आहेत टीपी मुंडे?

  • काँग्रेस प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली
  • 1990 ला जयदत्त क्षीरसागर यांच्याविरोधात भाजपच्या तिकिटावर चौसाळा मतदारसंघात अल्प मताने पराभव झाला
  • 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात 51 हजार मते मिळवली
  • 2009 ला काँग्रेसच्या तिकिटावर पंकजा मुंडे यांच्याविरोधात 60 हजार मते मिळवली, तर पंकजा मुंडे यांना 96 हजार मते होती.
  • 2014 च्या विधानसभा निवडणुकीत टीपी मुंडे यांनी काँग्रेसकडून लढताना 15 हजार मते मिळवली, तर पंकजा मुंडे 96 हजार, धनंजय मुंडे 71 हजार मते होती
  • याशिवाय दोन वेळा परळी नगरपालिका ताब्यात घेऊन दोन वेळा ते नगराध्यक्ष झाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *