TV9-C Voter Exit Poll : मध्य प्रदेशात भाजपला फटका, काँग्रेसला लाभ

TV9-C Voter Exit Poll | मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता गेली, मात्र तरीही मोदी लाट कायम असल्याचे एकूण चित्र एक्झिट पोलवरुन दिसते आहे. मध्य प्रदेशात लोकसभेच्या एकूम 29 जागा आहेत. TV9-C Voter च्या एक्झिट पोलनुसार भाजपला 29 पैकी 24 जागा मिळतील, तर काँग्रेसला 5 जागा मिळतील. कुणाला किती जागा मिळतील? 2014 च्या लोकसभा निवडणुकीत …

TV9-C Voter Exit Poll : मध्य प्रदेशात भाजपला फटका, काँग्रेसला लाभ

TV9-C Voter Exit Poll | मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता गेली, मात्र तरीही मोदी लाट कायम असल्याचे एकूण चित्र एक्झिट पोलवरुन दिसते आहे. मध्य प्रदेशात लोकसभेच्या एकूम 29 जागा आहेत. TV9-C Voter च्या एक्झिट पोलनुसार भाजपला 29 पैकी 24 जागा मिळतील, तर काँग्रेसला 5 जागा मिळतील.

कुणाला किती जागा मिळतील?

पक्षजागांचा अंदाज (मध्यप्रदेश)मतांची टक्केवारी
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)2455.70
संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA)0535.20
इतर009.10
एकूण29

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 29 पैकी 27 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या.

2018 मध्ये मध्य प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव पत्कारावा लागला होता आणि काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतही भाजपला फकटा बसेल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात भाजपला फारसा फटका बसलेला दिसत नाही.

मध्य प्रदेशात काँग्रेसच्या ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजय सिंह, मिनाक्षी नटराजन आणि कांती लाल भूरिया यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, नरेंद्र सिंह तोमर, के पी यादव आणि सुधीर गुप्ता यांच्यासारखे उमेदवारही महत्त्वाचे आहेत. नेमका कोण विजयी होतो, हे 23 मे रोजीच कळेल.

संबंधित बातम्या : 

Tv9 C Voter exit poll Maharashtra : महाराष्ट्रात युतीला 34 जागा

Tv9-C Voter Exit Poll : यूपीत सपा-बसपाची जोरदार मुसंडी, भाजपला भगदाड

Tv9-C Voter Exit Poll : देशात मोदींना बहुमत, काँग्रेस 100 च्या आत!

Tv9-C Voter Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये भाजपची किंचित वाढ, बाकी दीदींचाच दबदबा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *