4000 पेक्षा जास्त विधानसभा क्षेत्रात सर्व्हे, टीव्ही 9 मराठीवर सर्वात मोठा एक्झिट पोल

4000 पेक्षा जास्त विधानसभा क्षेत्रात सर्व्हे, टीव्ही 9 मराठीवर सर्वात मोठा एक्झिट पोल

मुंबई : सातव्या टप्प्यात 8 राज्यातील 58 जागांसाठी मतदान संपातच टीव्ही 9 मराठीवर एक्झिट पोल दाखवला जाईल. टीव्ही 9 मराठी आणि सी-व्होटर यांनी मिळून देशभरातील 542 लोकसभा मतदारसंघातील 4 हजारांपेक्षा जास्त विधानसभा क्षेत्रांमध्ये पाच लाखांहून अधिक मतदारांचा सर्व्हे केलाय. गेल्या 25 वर्षांच्या निवडणुकांचा अनुभव असलेल्या सी-व्होटरचा एक्झिट पोल टीव्ही 9 मराठीवर 19 मे रोजी सायंकाळी 6 वाजता पाहता येईल.

पश्चिम बंगालसारख्या राज्यात हिंसाचार होत असतानाही सर्वेक्षकांकडून मतदारांनी कुणाला मत दिलंय ते जाणून घेण्यात आलं. हाच अचूक अंदाज 23 तारखेच्या निकालापूर्वी सत्ता कुणाची हे स्पष्ट करणार आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. पण त्यापूर्वी एक्झिट पोलमध्ये मतदारांनी कुणाला मत दिलंय त्याची आकडेवारी दाखवली जाईल.

बहुमतासाठी 272 जागांची आवश्यकता आहे. गेल्या निवडणुकीत एकट्या भाजपनेच 282 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीतही आम्ही 300 पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास भाजपने बोलून दाखवलाय. तर महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीत 42 जागा जिंकणाऱ्या शिवसेना-भाजप युतीने यावेळी जागा वाढतील असा दावा केलाय. त्यामुळे महाराष्ट्रातील लढतींसह देशातील निकालाचा अंदाज 19 मे रोजीच पाहता येईल.

सातव्या टप्प्यात कोणत्या राज्यातील कोणत्या जागेवर मतदान?

सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात आठ राज्यांमध्ये 59 जागांसाठी 19 मे रोजी मतदान होईल. यामध्ये बिहार, मध्य प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, चंदीगडसह पश्चिम बंगालमध्येही मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये यापूर्वी झालेल्या मतदानात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झालाय. त्यामुळे या टप्प्यामध्ये शांततेत मतदान पार पाडण्याची जबाबदारी यंत्रणेवर असेल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर स्वतःचा बालेकिल्ला वाचवण्याचं आव्हान आहे.

उत्तर प्रदेशातील 13 जागांवर मतदान

महाराजगंज, गोरखपूर, कुशीनगर, देवरिया, बासगाव, घोसी, सलेमपूर, बलिया, गाजीपूर, चंदौली, वाराणसी, मिर्झापूर आणि रॉबर्ट्सगंज या जागांवर मतदान होईल. 2014 च्या निवडणुकीत या सर्व 13 जागा भाजपने जिंकल्या होत्या.

मध्य प्रदेशात आठ जागांवर मतदान

देवास, उज्जैन, मंदसौर, खरगोन, खंडवा, रतलाम आणि धार या जागांसाठी मध्य प्रदेशात मतदान होईल. या सर्व जागा गेल्या निवडणुकीत भाजपने जिंकल्या होत्या. पण नंतर रतलाममध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला होता. त्यामुळे सध्या सात जागा भाजपकडे आहेत.

बिहारमध्ये आठ जागांसाठी मतदान

नालंदा, पाटणा साहिब, पाटलीपुत्र, आरा, बक्सर, सासाराम, काराकट आणि जहानाबाद या जागांसाठी मतदान होईल. 2014 मध्ये या आठपैकी भाजप 7 आणि आरएलसपीने एका जागेवर विजय मिळवला होता.

पंजाबमध्ये 13 जागांवर लढत

गुरदासपूर, अमृतसर, जालंधर, होशियारपूर, आनंदपूर साहिब, लुधियाना, फतेहगड साहिब, फरीदकोट, फिरोजपूर, बठिंडा, संगरुर, पटियाला आणि खडूर साहिब या जागांसाठी मतदान होईल. 2014 च्या निवडणुकीत आपने चार, अकाली दलने चार, काँग्रेसने तीन आणि भाजपने दोन जागा जिंकल्या होत्या.

पश्चिम बंगालमध्ये नऊ जागांसाठी मतदान

दमदम, बारासात, बशीरहाट, जयनगर, मथुरापूर, डायमंड हार्बर, जाधवपूर, कोलकाता दक्षिण और कोलकाता उत्तर या जागांसाठी मतदान होईल. 2014 मध्ये या सर्व जागांवर टीएमसीने विजय मिळवला होता.

झारखंडमध्ये तीन जागांवर निवडणूक

झारखंडमध्ये राजमहल, दुमका आणि गोड्डा या मतदारसंघांसाठी मतदान होईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI