LIVE: अभिनेत्री माही गिलवरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींची वेगवान माहिती एका क्लिकवर...

LIVE: अभिनेत्री माही गिलवरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक
Picture

अभिनेत्री माही गिल हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

अभिनेत्री माही गिल हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक, न्यायालयाकडून 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी, कृष्णा सोनार, सोनू दास, सुरज शर्मा अशी आरोपींची नावे

20/06/2019,4:09PM
Picture

मोठ्या प्रतिक्षेनंतर नागपुरात पावसाचे आगमन

मोठ्या प्रतिक्षेनंतर नागपुरात पावसाचे आगमन, उकाड्यापासून नागपूरकरांना मोठा दिलासा

20/06/2019,4:02PM
Picture

शिवसेनेकडील औरंगाबाद पालकमंत्रीपदावर भाजपचा दावा

शिवसेनेकडील औरंगाबाद पालकमंत्रीपदावर भाजपचा दावा, अतुल सावे यांची मंत्रीपदी निवड झाल्यावर भाजपची मागणी, भाजपकडून शहराच्या सर्वांगीण विकासाचे कारण

20/06/2019,3:41PM
Picture

नाशिकमधील काळाराम मंदिरासमोर पुरातन पायऱ्या सापडल्या

नाशिकमधील काळाराम मंदिरासमोर पुरातन पायऱ्या सापडल्या, खोदकामादरम्यान लक्षात आले, पुरातन भुयारी मार्ग असण्याची शक्यता, याआधीही भुयारी मार्ग सापडला होता

20/06/2019,3:38PM
Picture

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तातडीने संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली, उद्या दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात होणार बैठक, विधानसभा निवडणुकीच्या आढाव्याची शक्यता

20/06/2019,3:35PM
Picture

केडीएससी उपमहापौराला शिवीगाळ आणि जीवे ठार मारण्याची धमकी

केडीएससी उपमहापौराला शिवीगाळ, आरोपी उमेश साळुंखेकडून कार्यालयात येऊन जीवे ठार मारण्याचीही धमकी, रस्त्यावर अनधिकृत बांधकामाविरोधात प्रश्नाची पार्श्वभूमी, आरोपी साळुंखेवर अनधिकृत बांधकामाचा आरोप

20/06/2019,3:30PM
Picture

नांदगावात किरकोळ वादातून आई आणि मुलाची विष घेत आत्महत्या

नांदगावमधील जळगाव खुर्दमध्ये किरकोळ वादातून आई आणि मुलाची विष घेत आत्महत्या, मंदाबाई सरोदे आणि गणेश सरोदे अशी मृतांची नावे, घटनेमुळे परिसरात शोककळा

20/06/2019,3:20PM
Picture

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उद्धव ठाकरेंच्या भेटीला

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उद्धव ठाकरेंच्या भेटीला, कोपर्डी घटनेतील पीडितेचे आई-वडिलही हजर, मोर्चा काळात मराठा युवकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा करणार

20/06/2019,12:37PM
Picture

रत्नागिरी-कोचिवली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, रेल्वे करबुडे बोगद्यात अडकली

रत्नागिरी-कोचिवली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, रेल्वे करबुडे बोगद्यात अडकली, पाऊण तासानंतर दुसरं इंजिन उपलब्ध

20/06/2019,12:22PM
Picture

मॉलमध्ये पार्किंग मोफक करा, शिवसेना नगरसेवकांची मागणी

नाशिककरांची लुट थांबवा, मॉलमध्ये पार्किंग मोफक करा, शिवसेना नगरसेवकांची मागणी, महासभेत फलक फडकावले

20/06/2019,12:19PM
Picture

उत्तरप्रदेश सरकार महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कधी घेणार? : प्रियांका गांधी

उत्तरप्रदेशमध्ये महिलांना दहशतीच्या वातावरणात ढकललं जात आहे, उत्तरप्रदेश सरकार महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कधी घेणार? प्रियांका गांधींचा सवाल


20/06/2019,12:13PM
Picture

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, याला जबाबदार कोण? : अजित पवार

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, याला जबाबदार कोण? अजित पवारांचा विधानसभेत सवाल

20/06/2019,12:06PM
Picture

कोयना धरण परिसरात 4.8 रिश्टर तीव्रतेचे भुकंपाचे धक्के

कोयना धरण परिसरात सौम्य भुकंपाचे धक्के, 4.8 रिश्टर तीव्रता, परिसरात काळजीचे वातावरण

20/06/2019,9:08AM
Picture

बनावट मुद्रांक घोटाळ्याची व्याप्ती वाढली

बनावट मुद्रांक घोटाळ्याची व्याप्ती वाढली, एकूण 86 लाख 38 हजारांचे बनावट स्टॅम्पपेपर जप्त, बनावट सही शिक्क्यांसह विक्री, विश्रामबाग पोलिसांकडून एकाच कुटुंबातील तिघांना अटक

20/06/2019,8:46AM
Picture

20/06/2019,8:05AM
Picture

छत्तीसगडमध्ये वऱ्हाडी वाहन आणि मालवाहक ट्रकच्या अपघातात 8 ठार, 24 जखमी

छत्तीसगडमध्ये वऱ्हाडी वाहन आणि मालवाहक ट्रकमध्ये भीषण अपघात, 8 ठार, 24 जखमी, जखमींमध्ये दोघांचीह प्रकृती गंभीर, चालकाने झोप लागल्याने घटना

20/06/2019,8:00AM
Picture

कोल्हापूरमध्ये ठिकठिकाणी ईडीचे छापे

कोल्हापूरमध्ये ठिकठिकाणी ईडीचे छापे, बांधकाम व्यावसायिक, सराफ व्यावसायिक यांच्यासह माजी नगरसेवकांचा समावेश, कारवाईदरम्यान कमालीची गुप्तता

20/06/2019,7:54AM
Picture

मुंबईच्या चर्चगेट येथील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आग

मुंबईच्या चर्चगेट येथील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आग, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, कागदपत्रे आणि स्टेशनरी जळून खाक, अग्निशामक दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल, आग नियंत्रणात

20/06/2019,7:16AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *