LIVE : जनादेशाच्या अनादरामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली : सुधीर मुनगंटीवार

राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भासह राजकारणातील सर्व घडामोडी एका क्लिकवर

LIVE : जनादेशाच्या अनादरामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली : सुधीर मुनगंटीवार
Picture

जनादेश असल्यामुळे लवकर सरकार स्थापन व्हावे ही इच्छा होती. आम्ही कुठल्याही पर्यायाचा शोध घेतला नाही.पण आमच्या मित्रपक्षानं इतर पर्याय असल्याचं म्हटलं – सुधीर मुनगंटीवार

12/11/2019,8:46PM
Picture

कोअर कमिटीची बैठक झाली, भाजप राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आज राष्ट्रपती शासन लागू झालं. काही राजकीय पक्षांनी जनादेशाचा आदर केला. शेतकरी संकटात आहे, अनेक समस्या आहे, जनादेशाच्या अनादरामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली – सुधीर मुनगंटीवार

12/11/2019,8:46PM
Picture

आदित्य ठाकरेंचा आज आमदारांसोबत हॉटेल द रिट्रीटमध्येच मुक्काम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रिट्रीट हॉटेलमधून मातोश्रीकडे निघाले, आदित्य ठाकरे आज आमदारांसोबत हॉटेल द रिट्रीटमध्येच मुक्काम करणार

12/11/2019,8:41PM
Picture

लवकरच सत्तेचे नवे समीकरण : छगन भुजबळ

बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता, त्यांच्याशी शरद पवार आणि अहमद पटेल बोलले आहेत, जी बैठक झाली त्या संदर्भात माहिती देण्यात आली. लवकरच यावर तोडगा निघून सत्तेचे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल – छगन भुजबळ

12/11/2019,8:35PM
Picture

भाजप सत्ता स्थापनेवर दावा करणार, निश्चित भाजप सत्ता स्थापन करेल, मी भाजपला सर्वतोपरी मदत करणार, नारायण राणे यांची माहिती

12/11/2019,8:19PM
Picture

राज्यपालांचं सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला निमंत्रण नाही, हे चुकीचं : अहमद पटेल

महाराष्ट्रात सर्व मोठ्या पक्षांना सत्तास्थापनेबाबत विचारणा करणं अपेक्षित होतं, मात्र, राज्यपालांनी काँग्रेसला विचारणा न करताच राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली, हे चुकीचं

12/11/2019,7:42PM
Picture

दोन्ही पक्षाच्या नेत्यांची आज चर्चा झाली, शिवसेनेने अधिकृतपणे काँग्रेस-राष्ट्रवादीशी 11 नोव्हेंबरला संपर्क केला, त्यामुळे या महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा होणं अपेक्षित, दोन्ही पक्षांनी सर्वसहमती आल्यानंतर काही निर्णय घेतले : प्रफुल्ल पटेल

12/11/2019,7:40PM
Picture

काँग्रेस राष्ट्रवादीची संयुक्त पत्रकार परिषद, पत्रकार परिषदेला काँग्रेस नेते अहमद पटेल, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच दोन्ही पक्षातील इतर नेते उपस्थित

12/11/2019,7:40PM
Picture

राज्यपालांच्या निर्णयाविरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सकाळी 10.30 वा सुप्रीम कोर्टात सुनावणी, राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची कोर्टात धाव

12/11/2019,7:30PM
Picture

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे ह्या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे, असं ट्वीट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीवर केलं

12/11/2019,7:12PM
Picture

राज्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरं जावं लागणं चिंताजनक: छत्रपती संभाजी

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागणं अतिशय चिंताजनक, महाराष्ट्राच्या जनतेने सर्वच पक्षांना अत्यंत विश्वासाने मतदान करून जनादेश दिला, त्या लोकभावनेचा आदर केला पाहिजे : छत्रपती संभाजी

12/11/2019,6:35PM
Picture

मुख्यमंत्री पद अडीच-अडीच वर्षे, राष्ट्रवादीचा शिवसेनेला प्रस्ताव, तर काँग्रेसच्या बाहेरुन पाठिंब्याला राष्ट्रवादी प्रतिकूल

12/11/2019,6:23PM
Picture

काँग्रेसने सत्तेत यावं राष्ट्रवादीचा काँग्रेसला प्रस्ताव, तिन्ही पक्षांनी थेट सत्तेत सहभागी व्हावं, वाय. बीय सेंटरवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक

12/11/2019,6:21PM
Picture

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची ही तिसरी वेळ, महाराष्ट्राचा कारभार आता राजभवनातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चालवणार

12/11/2019,6:13PM
Picture

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल आणि अहमद पटेल मुंबईत दाखल, थोड्याच वेळात शरद पवार यांच्याशी चर्चा

12/11/2019,4:58PM
Picture

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील लीलावती रुग्णालयात

12/11/2019,4:47PM
Picture

गृहसचिव गृहमंत्र्यांच्या भेटीला

राष्ट्रपती राजवटीच्या शिफारशीनंतर दिल्लीत घडामोडींना वेग, गृहसचिव अजयकुमार भल्ला यांच्याकडून गृहमंत्री अमित शाह यांची भेट

12/11/2019,4:29PM
Picture

बच्चू कडू राजभवनावर धडकणार

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमदार बच्चू कडू 14 तारखेला राजभवनावर धडक मोर्चा काढणार, राज्यात शेतकरी हवालदिल, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे, कडू यांची मागणी

12/11/2019,4:27PM
Picture

राष्ट्रवादीच्या मागणीमुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्याची शक्यता

12/11/2019,4:10PM
Picture

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस, शिवसेना सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत

12/11/2019,3:27PM
Picture

तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार होणार नाही : नवाब मलिक

12/11/2019,3:20PM
Picture

मोदींनी बोलावली तातडीची बैठक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली, ब्राझील दौऱ्यापूर्वी कॅबिनेट मंत्र्यांसोबत चर्चा

12/11/2019,2:00PM
Picture

महाधिवक्ते राज्यपालांच्या भेटीला

महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला राजभवनावर

12/11/2019,1:55PM
Picture

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यपालांच्या भेटीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता

12/11/2019,1:37PM
Picture

शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची मातोश्रीवर बैठक

शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची ‘मातोश्री’वर बैठक, बैठकीसाठी एकनाथ शिंदे, रामदास कदम मातोश्रीवर दाखल, मातोश्रीवर बैठक असल्यामुळे आदित्य ठाकरे हॉटेल रिट्रीटला जाणार नाहीत

12/11/2019,1:19PM
Picture

आशिष शेलार आणि संजय राऊत यांची विशेष कक्षात चर्चा

12/11/2019,12:30PM
Picture

आशिष शेलार यांनी संजय राऊत यांची भेट घेतली, लीलावती रुग्णालयात भेट

भाजप नेते आशिष शेलार संजय राऊत यांच्या भेटीला, शेलारांकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस

12/11/2019,12:26PM
Picture

काँग्रेसची रद्द झालेली बैठक पुन्हा ठरली

काँग्रेसची रद्द झालेली बैठक पुन्हा ठरली, काँग्रेसचे केंद्रीय नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेणार, मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल मुंबईत येणार, जयपूरचे आमदार संध्याकाळी मुंबईत परतणार

12/11/2019,12:17PM
Picture

संजय राऊतांच्या भेटीसाठी भाजप नेतेही लीलावती रुग्णालयात, भाजप आमदार आशिष शेलार भेट घेणार

संजय राऊतांच्या भेटीसाठी भाजप नेतेही लीलावती रुग्णालयात, भाजप आमदार आशिष शेलार भेट घेणार

12/11/2019,12:13PM
Picture

शिवसेना नेते सुभाष देसाई आणि हर्षवर्धन पाटील संजय राऊत यांच्या भेटीला

शिवसेना नेते सुभाष देसाई आणि हर्षवर्धन पाटील संजय राऊत यांच्या भेटीला, संजय राऊत यांची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी लीलावती रुग्णालयात

12/11/2019,12:05PM
Picture

उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या भेटीला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या भेटीसाठी लीलावती रुग्णालयात, उद्धव ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरेही लिलावतीमध्ये दाखल

12/11/2019,12:01PM
Picture

अरविंद सावंत यांचा राजीनामा स्वीकारला, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाचा कार्यभार

12/11/2019,11:58AM
Picture

राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांची एकत्र बैठक

आमदारांच्या बैठकीआधी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक, राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांची एकत्र बैठक, सत्तासंघर्षावरुन आधी नेत्यांची चर्चा

12/11/2019,11:56AM
Picture

राष्ट्रवादीकडून शिवसेनेला 50-50 चा प्रस्ताव, मुख्यमंत्रीपदाचीही मागणी -सूत्र

राष्ट्रवादीचा शिवसेनेला 50-50 चा प्रस्ताव, राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदाची मागणी, सीएम पदावरुन वाटाघाटी लांबल्या, प्रस्ताव रखडल्याने पत्र नाही, सूत्रांची माहिती

12/11/2019,11:46AM
Picture

शिवसेना खासदार संजय राऊत यांची लेखणी लीलावती रुग्णालयातही सुरु

12/11/2019,11:42AM
Picture

शरद पवारांमुळे पाठिंब्याचं पत्र देण्यास उशिर, माणिकराव ठाकरेंचा दावा

12/11/2019,10:06AM
Picture

आम्ही काँग्रेसच्या पत्राची वाट पाहात होतो, त्यांचं पत्र मिळालं नाही, दोघे मिळून निर्णय घेऊ - अजित पवार

12/11/2019,10:06AM
Picture

शरद पवार लीलावती रुग्णालयाच्या दिशेने रवाना, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार

12/11/2019,10:05AM
Picture

राष्ट्रवादीच्या गोटात हालाचालींना वेग, सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या नेत्यांची आमदारांसोबत भेट, दुपारी 1 वाजता राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक

12/11/2019,10:04AM
Picture

उद्धव ठाकरे सकाळी 10 वाजता शिवसेना आमदारांची भेट घेणार, मालाडच्या द रिट्रीट हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांशी चर्चा करणार

12/11/2019,10:00AM
Picture

काँग्रेस नेत्यांची शरद पवारांसोबतची बैठक रद्द

12/11/2019,9:58AM
Picture

शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा, पण दोन्ही काँग्रेसचं पाठींब्याचं पत्रच नाही

12/11/2019,9:57AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *