उदयनराजेंची पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया, मी रडीचा डाव खेळत नाही, आदरणीय पाटीलसाहेब जिंकले खरं आहे!

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजप नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle first reaction) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

  • Updated On - 11:22 am, Sat, 26 October 19
उदयनराजेंची पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया, मी रडीचा डाव खेळत नाही, आदरणीय पाटीलसाहेब जिंकले खरं आहे!

सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजप नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle first reaction) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.  उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle first reaction)  यांनी काल ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर आज उदयनराजेंनी मीडियासमोर येऊन प्रतिक्रिया दिली.

“रडीचा डाव मी खेळत नाही. आदरणीय पाटीलसाहेब जिंकले हे खरं आहे. पण लोकसेवा काय केली हे लोकांनी पाहिले पाहिजे. यापुढेही मी कार्यरत राहणार असून खचणार नाही”, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा निकालाकडे जसं राज्याचं लक्ष होतं, तसंच लक्ष सातारा लोकसभा पोटनिवडणुकीडेही होतं. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीनिवास पाटील (Udayanraje Bhonsle vs Shriniwas Patil) यांच्यात लढत झाली. उदयनराजे भोसले यांना 5 लाख 48 हजार 903 इतकी मतं मिळाली तर श्रीनिवास पाटील (Udayanraje Bhonsle vs Shriniwas Patil) यांना 6 लाख 36 हजार 620 मतांसह बाजी मारली. उदयनराजेंचा तब्बल 87 हजार 717 मतांनी पराभव झाला.

उदयनराजेंचं ट्विट

“आज हरलो आहे पण थांबलो नाही, जिंकलो नाही पण संपलो ही नाही, असे ट्विट काल उदयनराजेंनी केलं होतं. लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील लाखो जनतेचे आणि दिवस रात्र एक करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार. सदैव आपल्या सेवेशी तत्पर असे उदयनराजेंनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.”

उदयनराजे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी 87 हजार 717 मतांनी पराभव केला. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या या धक्कादायक निकालाने उदयनराजेंच्या समर्थकांमध्ये चांगलीच अस्वस्थता  पसरली. उदयनराजे मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून पिछाडीवर राहिले. उदयनराजे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात (Udayanraje Bhosale Tweet) आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांना 6 लाख 36 हजार 620 मते (51.04%) मिळाली. तर उदयनराजेंना 5 लाख 48 हजार 903 मते (44.01%) मिळाली. श्रीनिवास पाटील यांना या पोटनिवडणुकीत 87 हजार 717 मतांची आघाडी मिळाली.

लोकसभा पोटनिवडणुकीतील निकालानंतर उदयनराजेंनी आपण हरल्यास पुढील 5 वर्षे साताऱ्याचा विकास थांबेल असं म्हटलं. “एक पाऊल मागे जाणं हे मोठी झेप घेण्यासाठी असतं. लोकांनी विचार करुन मतदान केलंय. प्रचारात मी काय केलं हे स्पष्टपणे सांगितले आहे. मी जर निवडून आलो नाही, तर पुढील 5 वर्षे विकास थांबेल.” असे उदयनराजे भोसले म्हणाले.

संबंधित बातम्या 

उदयनराजेंचा पराभव, जितेंद्र आव्हाडांचा राजेंवर पुन्हा हल्ला!   

लोकसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर उदयनराजेंचं भावनिक ट्विट 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI