AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाची नेमकी चूक हेरली? भर मोर्चातून केली गर्जना…थेट ज्ञानेश कुमारांचा बापच काढला

उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या नेमणुकीवर आक्षेप घेतला आहे. या मोर्चातून पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाची नेमकी चूक हेरली? भर मोर्चातून केली गर्जना...थेट ज्ञानेश कुमारांचा बापच काढला
uddhav thackerayImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 1:42 PM
Share

केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुत्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधूंनी दंड थोपटले आहेत. ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चात एसआयआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी दोन प्रमुख मागण्या केल्या. त्यात त्यांनी एसआयआर रद्द करण्याची मागणी प्रामुख्याने केली. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगच्या आयुक्तांच्या निवडीवर आक्षेप घेतला. राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होते, मग निवडणूक आयुक्तांची का नाही? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. भारत देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा नाही, असं म्हणत ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला.

देशभरात केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात वातावरण तापलं आहे. देशभरात विरोधीपक्षांकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे बंधूंच्या पुढाकारने आयोजित गर्जना मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर घटक पक्षाचे नेते मोर्चात सहभागी झाले. या गर्जना मोर्चातून उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘तुमचे सर्वांचे आभार मानतो. जनसागर उसळला आहे. त्यांचे आभार मानतो. हा लढा जातीपाती, धर्माचा नाही, तर हा लढा आपल्या स्वातंत्र्याचा लढा आहे. मला आठवत आहे. मोदी निवडून आले, त्यावेळी त्यांनी मेक इन इंडियाची घोषणा केली होती. परंतु आता मेक इन इंडियात हुकूमशहा तयार होत असेल, त्यांना गाडण्यासाठी आम्ही उभे ठाकलो आहोत. बाकी सर्व ठीक आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून हुकूमशहा होत असाल, तर गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही.

‘मी राज, थोरातांचं भाषण ऐकलं. संपूर्ण देशात 13 कोटी मतदार वगळले आहेत. महाराष्ट्रातील मतदारांची संख्या वगळून टाकली आहे. बंगाल, तामिळनाडूत मतदार वगळले आहे. बंगालमध्ये वगळले, त्यातील काही वैध झाले. आता तिथे पोटनिवडणूक आहे. त्यांना अधिकार मिळावा म्हणून सुप्रीम कोर्टात गेले. 6 तारखेला निवडणूक आहे. तर सुप्रीम कोर्टाने  5 तारखेला सुनावणी घ्यायचं ठरवलं. खरंतर त्यांनी सर्व संस्था ताब्यात घेतल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या आयुक्ताची निवडणूक का होत नाही, त्यांची नेमणूक का होते. कमिटीत आधी सरन्यायाधीश, पंतप्रधान, विरोधीपक्ष नेते होते. आता त्याच्यातून सरन्यायाधीश काढून टाकले. आता कमिटीत अमित शहांना टाकलं. यावर राहुल गांधींनी आक्षेप घेतला. पुढे अमित शहांनी ज्ञानेश कुमार यांना नेमलं. आता कोर्टात प्रकरण गेल्यावर तारीख पे तारीख सुरू आहे. एसआयआर हा गैरकायदा आहे.. नागरिकत्व रद्द अधिकार करण्याचा ज्ञानेश कुमार यांच्या बापाचा नाही. म्हणजे अमित शहा यांचा… अमित शहा हे ज्ञानेश कुमारांच्या माध्यमातून हा अधिकार वापरत आहे. सर्वत्र मतदार वगळले जात आहे’.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...