Video : …तर पुन्हा संजयला खोट्या प्रकरणात गोवलं जाऊ शकतं! उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली भीती

संजय राऊत यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची घेतली भेट, भेटीनंतर पार पडली महत्त्वाची पत्रकार परिषद

Video : ...तर पुन्हा संजयला खोट्या प्रकरणात गोवलं जाऊ शकतं! उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली भीती
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची पत्रकार परिषदImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 10, 2022 | 1:36 PM

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना पुन्हा एखाद्या खोट्या प्रकरणात गोवलं जाऊ शकतं, अशी भीती व्यक्त केली आहे. ते मातोश्रीवर (Matoshree) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. संजय राऊत यांनी जामीन मिळाल्यानंतर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने संजय राऊत यांनी अटक केली होती. तब्बल 102 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर संजय राऊत यांनी अखेर बुधवारी जामीन मिळाला होता. बुधवारीच संजय राऊत यांची आर्थर रोड जेलमधून सुटका झाली होती. दरम्यान, कालच ते उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता होती. मात्र त्यांनी अखेर आज दुपारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं की,…

केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून अनेक पक्ष फोडले गेले, अनेक पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जातोय. बेकायदेशीर अटक केली जातेय. खोटे गुन्हे दाखल केले जात आहे.

हे सुद्धा वाचा

कालचा दणका न्यायालयाने केंद्राला दिल्यावरही कदाचित कुठल्या तरी खोट्या केसेसमध्ये परत संजयला गोवण्याचा प्रयत्न होऊ शकेल.

पाहा व्हिडीओ :

हायकोर्टाने संजय राऊत यांची अटक बेकायदेशी असल्याचं परखड निरीक्षण बुधवारी नोंदवलं होतं. यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, एवढ्या चपराकी लाज वाटण्यासारख्या आहेत. हे (भाजपचं सरकार) केंद्रात सरकार नसतं तर अशा घटना घडल्या नसत्या. कर नाही त्याला डर कशाला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना यावेळी सुनावलंय.

संजय राऊत यांना गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी गोवण्यात आलं असल्याचा आरोप याआधीही शिवसेनेकडून करण्यात आला होता. फक्त ईडीच नव्हे तर वेगवेगळ्या केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही राऊतांनी वेळोवेळी केला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा उद्ध ठाकरे आणि संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधलाय.

घाबरुन पक्षातून काही लोकं पळून गेले. त्यांनाही हा मोठा धडा आहे. न्यायालयं निष्पक्षपातीपणे निर्णय देत आहे, ही चांगली गोष्ट आहे, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.